दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाचे निदान 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन … Read more

कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील ‘टॉप १००’ विद्यापीठांच्या यादीत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली असून, त्यात देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने स्थान पटकाविले आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था या गटामध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट 50 संस्थांमध्ये गणले गेले असून, महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. … Read more

अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये, कोरोना चाचणी होणार

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होतेय. यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील. मग ती हॉस्पिटल्स … Read more

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली … Read more

रेल्वे कर्मचाऱ्याला पाकिस्तानी गुप्तहेराने विचारले ‘हे’ तीन प्रश्न; भारतीय लष्कराच्या हालचालींवर ठेवत होते पाळत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या गुप्तहेरांच्या संपर्कात आलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या या दोन्ही गुप्तहेरांनी भारतीय सैन्याच्या हालचालीशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी रेल्वे भवनात सापळा रचला होता, सध्या रेल्वेच्या या दोन्ही कर्मचार्‍यांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे. पाकिस्तानी गुप्तहेरांशी कनेक्शन असल्याच्या संबंधात, रेल्वेच्या २ … Read more

१२ वर्षाच्या वयात केवळ साठवलेल्या पैशातून तिने ३ मजुरांचे विमानाचे तिकीट काढले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलांनी आपल्या साठवलेल्या पैशातून गरीब लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या पॉकेटमनीत मिळालेल्या पैशातून एका मुलीने असेच एक कौतुकास्पद काम केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या काळात संचारबंदीमुळे मजुरांचे होणारे हाल ती सातत्याने दूरदर्शनवरून पाहत होती. आणि आपण ही आपली जबाबदारी म्हणून काहीतरी केले पाहिजे म्हणून तिने चक्क तिच्या साठवलेल्या … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका; जून मध्ये पेट्रोल ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पेट्रोल पंपावर प्रतिलिटर ४ ते ५ रूपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास तयार रहा. पुढील महिन्यापासून सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज रिवाइज करण्यासाठी तयारी करीत आहेत. गेल्या आठवड्यात किरकोळ इंधनाबाबत सरकारी तेल कंपन्यांनी बैठक घेतली होती. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊनसाठी रोडमॅप तयार करण्यात आला … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. … Read more

दिल्लीत IRS अधिकाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

नवी दिल्ली । दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात एका आयआरएस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या निवासस्थानी छताच्या पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. ते १९८८ च्या बॅचचे भारतीय रिव्हेन्यू अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचे नाव केशव सक्सेना असे होते. जे भारतीय आयकर विभागात प्रधान आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांचे वय ५७ वर्षे … Read more

लपूनछपून दिल्लीतून चीनला पाठवले जात होते ५ लाख मास्क अन् ५७ लिटर सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता, देशात मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीईच्या किटची मागणी वाढत आहे. या दरम्यान, सध्या गरज असलेल्या या वस्तू बेकायदेशीरपणे चीन तसेच अन्य देशांत एक्सपोर्ट केल्याचा एक प्रकार नुकताच समोर आला आहे. गुप्तचरां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतील आयजीआय विमानतळावर एयर कार्गो वर कस्टम विभागाकडून छापे टाकण्यात … Read more