महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. अनेक दिग्गज नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेण्यास जात आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केल्यानंतर राजकिय वर्तुळात विविध चर्चांना पेव फुटला. तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे देखील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या काही बातम्या आल्या. मात्र हे सर्व भाजपकडून पेरले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. आता चव्हाण यांना राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची धुरा देण्यात येऊ शकते अशा चर्चा सुरु आहेत. तर आक्रमक नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची चिन्हं आहेत अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे कालच दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकलेली नाही असे समजत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment