काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद पाडून राज्यातील जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, आमचा पक्ष तुमच्यासाठी कार्य करेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उमरगा  येथील सभेत केले.

‘ओमराजेंनी भाजप संपवली म्हणून हल्ला केला!’ हल्लाखोर टेकाळेचा ओमराजेंवर आरोप

कळंब तालुक्यामध्ये भाजपला कमी समजलं जातं. ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्यातून भाजपा संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावरील या रागामुळंच मी ओमराजेंवर हा हल्ला केला असा आरोप ओमराजेंवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेने केला आहे. सोबतच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.

धक्कादायक..!! ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न

उस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना घडली असून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे.

महायुतीच्या स्टेजवरून शिवसेना खासदार हद्दपार; उस्मानाबादमध्ये निंबाळकर – पाटील कोल्ड वॉरला आणखीनच धार

सभास्थळावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो नाही. महायुतीची सभा असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचारावेळी भाजपबरोबर सेनेचेही झेंडे असं चित्र असताना सेनेचा एकही झेंडा या परिसरात पहायला मिळाला नाही.

सभेत कुत्रा घुसला अन.. पवारांनी उडवली सेनेची खिल्ली

उस्मानाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर दौरा करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे उस्मानाबाद मध्ये आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या सभेत कुत्रा घुसला अन् त्यानंतर पवारांनी जे वक्तव्य केल त्या  वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उस्मानाबादेत सभा सुरु असताना शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून … Read more

राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपचा धक्का ; शिवसेनेसोबत वाटाघाटी फसल्याने मतदारसंघात बदल

उस्मानाबाद प्रतिनिधी |  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपने चांगलाच धक्का दिला आहे. त्याचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर नकरता त्यांची उमेदवारी तुळजापूर मतदारसंघातून जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना तुळजापूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावता येतो का हे बघण्यासारखे राहणार आहे. युतीच्या सरकराच्या काळात जाणीवपूर्वक उस्मानाबाद जिल्ह्याला विकासापासून वंचित … Read more

ओमराजे निंबाळकर यांच्यावर फसवणुकीचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

उस्मानाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य ५ जणांवर फसवणुकीचा आणि शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.   उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने स्वतःची फसवणूक झाल्यामुळे दि. १२ एप्रिल २०१९ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. दरम्यान … Read more

गणेश विर्सजनाच्या दिवशी किल्लारीचे लोक आजही असतात भीतीच्या सावटाखाली

विशेष प्रतिनिधी |   सुरज शेंडगे , नैसर्गिक आपत्ती आल्यास किड्या मुंगी सारखी माणसे मरतात याचाच प्रत्येय भारताला सर्व प्रथम किल्लारीच्या भूकंपात आला. किल्लारी गावाजवळच्या एकोंडी गावी ३० सप्टेंबर १९९३च्या पहाटे ३. ५५ मिनिटाने जोराचा आवाज झाला आणि क्षणार्धात होत्याच नव्हते झाले. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ गावे भुईसपाट झाले. २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी … Read more

उस्मानाबाद काँग्रेसला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांचा शिवसेनेत प्रवेश

उस्मानाबाद प्रतिनिधी| अनेक नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग-आउटगोइंगचे उस्मानबाद जिल्ह्यात पण पाहायला मिळाले. राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्याचा प्रत्यय म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. या सर्वांनी राजीनामे दिल्यानंतर हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत … Read more

शरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

उस्मानाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचे लोण थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातेवाईक आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. राणा जगजितसिंह पाटील यांनी या संदर्भात कसलाच निर्वाळा दिला नसला तरी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मनाला जातो आहे. राणाजगजितसिंह पाटील … Read more