चंद्रकांत पाटलांचा मुंडे-खडसेंना सूचक इशारा; म्हणाले…
केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल
केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल
भाजप हा माझ्या बापाचा पक्ष असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय धुमश्चक्रीला जिवंतपणा आणून देण्याचं काम गोपीनाथगडावर आज केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे, महादेव जानकर यांनी आपली खदखद बाहेर काढली.
पंकजाचा परळी मधील पराभव हा झाला नसून घडवून आणला असल्याची टीकाही खडसेंनी केली आहे. त्यामुळे पंकजांना देखाली पक्षात खूप त्रास दिला जात आहे. परंतु त्यांना बोलता येत नाही असंही खडसेंनी सांगितलं आहे. पक्षांतरावर बोलताना खडसे म्हणाले कि कितीही त्रास झाला तरी सध्या पंकजा पक्ष सोडणार नाही.
दिल्ली दरबारी गेलेल्या खडसेंना पक्ष नेतृत्वाने भेट नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्या लागोपाठ भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही.
बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘आप्पा, तुमचाच वारसा … Read more
१२ डिसेंबर ला होणाऱ्या या मेळाव्यात पंकजा यांनी सर्व समर्थकांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का
निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. परंतु आता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.
पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे. पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपानं ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळात निष्ठावंतांना तिकीट नकारत डावललं होतं. यात एकनाथ खडसे हे नाव सर्वात पुढं होत. निवडणुकी दरम्यान आणि नंतरही खडसे याबाबतची आपली खंत वारंवार माध्यमांमध्ये बोलून दाखवत आहेत. या नाराजी प्रकरणात आता एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. या भेटीतून सुरु झालेल्या चर्चांच्या मागचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी गोपीनाथ गडावरील मेळाव्यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.
भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या हक्काच्या परळी मतदार संघातून विधानसभेसाठी उभ्या होत्या. मात्र त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.