मालदन गावचे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे

(लेखन ः- राजेश साळुंखे, नवी मुंबई)ः-  स्वातंत्र्यापूर्व काळात नुसता ब्रिटिश ऑफिसरला काळा झेंडा दाखवलाच नाही तर मालदनच्या जुन्या पोलीस गेटवर चढून भारताचा तिरंगा फडकवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे (दादा) हे मालदन गावाचे रहिवासी होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ते सतत भाग घेत राहिले. ग्रामीण भागात राहून इंग्रज सरकारवर जेवढा जास्त … Read more

कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाईचे रविवारी मतदार संघात जल्लोषी स्वागत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने मतदार संघात मोठ्या जल्लोषाची तयारी सुरू आहे. रविवारी दि. 14 आॅगस्ट रोजी पाटण मतदार संघात ठिकठिकाणी आ. शंभूराज देसाई यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार नियोजन सुरू केले आहे. कराड तालुक्यातील … Read more

पुन्हा मंत्रीपद : मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रीपदाची पुन्हा लाॅटरी लागली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करण्यात आ. देसाई यांचा मोठा हात होता. त्यामुळे त्याचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली असून आता कॅबिनेट दर्जा मिळणार असल्याने देसाई समर्थकांच्यात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. आमदार … Read more

पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी 4 कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी 4 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : पाटणला चर्चा साहेबांच्या आदेशाची अन् कार्यकर्त्यांच्या टेहळणीची

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सोमवारी पार पडली. निष्ठा यात्रेत साहेबांच्या “त्या” आदेशाची आणि कार्यकर्त्यांच्या टेहळणीची चर्चा पाटण तालुक्यात सुरू आहे. यात्रेत आलेली लोक कोण आहेत, कोणत्या गटाची, पक्षाची आहेत. त्याचबरोबर साहेबांनी दिलेल्या “त्या” आदेशाची कोणी पायमल्ली केली. या सर्व गोष्टीची टेहळणी मल्हारपेठ येथील सभेत … Read more

पुणे- बेंगलोर महामार्गावर अपघातात पती- पत्नी ठार, 4 जखमी : वेगनार गाडीची उभ्या ट्रकला धडक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील नागठाणे वेगनार गाडीने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. मंगळवारी दि. 3 रोजी पहाटे 6 वाजण्यच्या सुमारास झालेल्या या अपघातात पती- पत्नी ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवरती हा अपघात झाला असून वेगनार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. … Read more

आदित्य ठाकरेची निष्ठा यात्रा मंगळवारी मल्हारपेठला : आ. शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता युवानेतृत्व आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. मंगळवारी दि. 2 ऑगस्टला आदित्य ठाकरे माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आ. शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात … Read more

कोयनानगरला दुर्मिळ “पट्टेरी पोवळा” जातीचा विषारी साप आढळला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील बसस्थानकाजवळ डिस्कवर कोयना पथकाच्या सदस्यांना दुर्मिळ असणारा पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप आढळला. येथील बसस्थानक परिसर हा नेहमीचे वर्दळीचे असून येथील रिक्षा थांब्याजवळ साप दिसल्याने मोठी गर्दी झाली. डिस्कवर कोयना पथकाचे वन्यजीवरक्षक निखिल मोहिते यांना समजताच त्यांनी तत्काळ तिथे जाऊन पाहिल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले. तीन फूट … Read more

कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. आज शुक्रवारी दि. 22 रोजी दुपारी 1 वाजता 3 रिश्टेल स्केलचा भूकंप झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी तसेच अर्थिक हानी झालेली नसल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे. पाटण तालुक्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अोसरला आहे. मात्र रिपरिप सुरू असताना … Read more

गुप्तधनासाठी नरबळी : करपेवाडीत आजीनेच घेतला नातीचा जीव

सातारा | पाटण तालुक्यातील तळमावले गावापासून काही अंतरावर असलेल्या करपेवाडी येथील महाविद्यालयीन 16 वर्षीय युवतीचा घरी परतताना 2019 साली खून झाला होता. अखेर साडेतीन वर्षानंतर या खुनातील आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून खूनाचा उलगडा करण्यात आला आहे. नातीचा आजीनेच गुप्तधनासाठी नरबळी दिल्याची माहिती समोर आलेली असून या गुन्ह्यात मांत्रिकासह 5 जण पोलिसांनी चाैकशीसाठी … Read more