आ. हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; जाधव यांच्या अडचणीत वाढ

मनसेचे माजी आ.हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे हर्षवधन जाधव यांच्या अडचनीत वाढ झाली आहे.

ज्योतिरादित्य सोडून गेल्याचा काहीच परिणाम होणार नाही- काँग्रेस आमदार अर्जुन सिंग यांचं मत

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे निष्ठावान राहिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मध्यप्रदेशच्या राजकारणात खळबळ माजलेली असताना ज्योतिरादित्य यांच्या पक्षात नसण्याचा काही परिणाम होणार नाही.

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय…! धनंजय मुंढेंचा आशिष शेलारांना टोला

पक्षी फडफडायला लागला की समाजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत  राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे. 

दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा आता संसदेत गाजणार; विरोधकांची राज्यसभेत चर्चेची मागणी

काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसाचाराचा मुद्दा सोमवारपासून सुरू होणाऱ्या बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात  मांडण्याची विरोधकांनी तयारी केली आहे. आम आदमी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती यांना राज्यसभेची कार्यवाही स्थगित करून दिल्ली हिंसाचाराची चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.

औरंगाबादेत बांधकाम विभागाचा २० कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा वीस कोटी रुपयाचा निधी परत जाण्याची शक्यता आहेत कारण हा निधी गेल्या वर्षभरापासून अखर्चित राहिल्याने हा मार्चपर्यंत खर्ची होईल का असा गहन प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.  
 

दिल्लीतील दंगल हे केंद्र सरकारचं अपयश – खा. अमोल कोल्हे

दिल्लीत सुरू असलेली दंगल हे केंद्र सरकारचं अपयश आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खा. अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘श्रीपाद छिंदमचे’ नगरसेवक पद रद्द

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला न्यायालयाने चांगलीच अद्दल घडवली आहे. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर कारवाई केली असून त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.

देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत, फडणवीसांनी दिलं भुजबळांना उत्तर

बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी….

जगभरातील मराठी माणसांकडून २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक मराठी अकादमीने याकरिता पुढाकार घेतला. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी बोलली, लिहली, वाचली ,ऐकली आणि वाढली पाहिजे.

भाजपकडून सावरकरांचा कामापुरताच वापर – शिवसेनेचा सामनामधून भाजपाला टोला

भाजपकडून सावरकरांचा कामापुरताच वापर होत आहे. असा टोला शिवसेनेनं सामनामधून भाजपाला लगावला आहे.