कोका-कोलाने अचानक जगभरातील आपल्या जाहिरात थांबवण्याचे आदेश का दिले; घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पुढील 30 दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सर्व जाहिरातींचे पेमेंट थांबवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार जगभरात वर्णभेदाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अधिकृतपणे या बहिष्कारामध्ये सामील … Read more

भाषण नको, रेशन हवे, वेतन हवे! कामगार संघटना पाळणार केंद्र सरकार विरोधात देशव्यापी ‘निषेध दिवस’

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटानं केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका मजूर-कामगार वर्गाला बसला आहे. उद्योगधंदे बंद असल्यानं उदरनिर्वाहाचं मोठं संकट त्यांच्या पुढं उभं आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले अनेक कामगार शहरांमध्ये अडकून पडले आहेत. तर सरकारी यंत्रणेतील इतर कर्मचाऱ्यांवर कोरोनामुळे ताण वाढला आहे. असं असताना, केंद्र सरकारनं कामगार, कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी … Read more

कोल्हापूरात स्ट्रीट लाईटसाठी दलित महासंघाने केलं ‘यमराज’ आंदोलन

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर गांधीनगर मेन रोडवरील वळीवडे कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत स्ट्रीट लाईटच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनस्थळी एक कार्यकर्ता दुचाकीवरून पडून मृत्युमुखी पडल्याचे भासवतो तर दुसरा कार्यकर्ता यमराजाच्या रूपात म्हशीवरून येतो. या आगळ्यावेगळ्या निदर्शनांमुळे संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे व … Read more

सोलापूरमध्ये भाजपचे थाळीनाद आंदोलन; सरकारच्या कामावर व्यक्त केली नाराजी

सोलापूर प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी भाजपने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भाषा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला … Read more

नगरमध्ये शिवसेनेने केलं वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन

अहमदनगर प्रतिनिधी । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्येएका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर पाहायला मिळत आहेत. आज अहमदनगमध्ये वारीस … Read more

गावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटवण्यासाठी शिवभक्ताचे शोले स्टाईल आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी एका शिवभक्ताने टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. नूल येथील रहिवाशी असलेल्या सागर मांजरे हा युवक जवळपास दोन तासांपेक्षा अधिक काळ या टॉवर वरती चढून बसला होता. येत्या १९ फेब्रुवारीला सर्व शिवभक्तांनी … Read more

जामिया विद्यापीठाजवळ अज्ञात माथेफिरू युवकाकडून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार; विद्यार्थी जखमी

दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी एक जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राजघाटकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू युवकाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असून गोळीबार करणाऱ्या संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

परभणीत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, आपल्या मागण्यांसाठी आता अधिक आक्रमक झाल्या असून, परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी, तसेच या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन लागू करावे.

”बिहारमध्ये NRC राबविण्याचा प्रश्नच नाही” – नितीश कुमार

NRC ची चर्चा फक्त आसामशी संबंधित होती असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NRC बद्दल केलेल्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे अमित शहा यांनी घेतलेल्या युटर्नला नितीश कुमारांकडून दुजोरा मिळाला आहे.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.