मी साखर उद्योगात पडलो तुम्ही पडू नका : नितीन गडकरी

पुणे प्रतिनिधी | साखर उद्योगाला आता बरे दिवस राहिले नाहीत आणि येत्या काळात देखील त्याला काही भवितव्य दिसत नाही असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एवढेच बोलून नितीन गडकरी थांबले नाहीत. तर त्यांनी साखर उद्योगात मी पडलो तुम्ही पडू नका असा चिमटा देखील काढला. ते पुण्यात आयोजित साखर परिषदेत बोलत होते. साखर उद्योग आणि … Read more

उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

पुणे  प्रतिनिधी |उपवासाच्या दिवशी एकदा नव्हे दोनदा उपवासाच्या पदार्था ऐवजी बटर चिकन पाठवल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात फिर्याद दाखल केल्याने झोमॅटो आणि संबधित हॉटले चालकाला ५५ हजार रुपयांचा दणका बसला आहे. धार्मिक भावना दुखवल्याने न्यायालयात गेलेल्या व्यक्तीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने पुण्यात या घटनेची चर्चा सर्वत्र चवीने चगळली जाऊ लागली आहे. षण्मुख देशमुख हे पुण्याचे … Read more

Pune wall collapse : दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; अजित पवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई प्रतिनिधी | पुण्यातील कोंढवा येथे भिंत खचून झालेल्या अपघातात १६ व्यक्ती ठार झाले आहेत. या भीषण प्रकार महानगरपालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे असा गंभीर आरोप अजित पवार यांनी आज विधान सभेत केला. त्याच प्रमाणे या प्रकारात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. कोंढव्यात सोमजी पेट्रोल पंपाजवळील … Read more

पुण्यात सिंहगड रोडला जॉगिंग ट्रॅक कोसळला ; २४ तासात दुसरी घटना

पुणे प्रतिनिधी | सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील फनटाईम सिनेमागृह जवळील कॅनॉल लगत असणारा जॉगिंग ट्रॅक कोसळल्याची घटना आज शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. मागील तीस तासापासून पुण्यात सतत पाऊससुरु असल्याने अशा घटना घडत आहेत. हा जॉगिंग ट्रॅक पुणे मनपाच्या वतीने उभारण्यात आला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. या अपघातात जीवित हाणी नसली तरी … Read more

पावसाच्या सरी अंगावर घेत तुकोबाची पालखी ‘लोणी काळभोर’ मुक्कामी

पुणे प्रतिनिधी | संत तुकाराम महाराजांची पालखी आज निवडुंग्या विठ्ठल मंदिर पुणे येथून पंढरपुरच्या दिशेने निघाली. सकाळी ६ वाजता आरती झाल्यानंतर पालखीने पुढील प्रवास सुरु केला. पुण्यात दोन दिवस मुक्काम केलेले वारकरी पाहते ३ वाजल्या पासूनच पुढील प्रवासासाठी सज्ज झाले होते. आरती होताच आपापल्या दिंड्या सज्ज करून वारकरी पुढील प्रवासासाठी पंढरीच्या दिशेने निघाले. पुलगेटमार्गे हडपसर येथे … Read more

पुणे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी एकाला कात्रीने भोकसले

पुणे प्रतिनिधी | जगात तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होऊ शकते असे बोलले जाते याचाच प्रत्येय आज पुण्यामध्ये आला आहे. महानगर पालिकेचा पाणी पुरवठा का खंडित झाला असे विचारताच संबंधित माणूस अंगावर धावून गेल्याने जाब विचारणाऱ्या व्यक्तीने त्याला कात्रीने भोकसले आहे. प्रकार केश कर्तनालायत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेंद्र कुसाळकर ( वय ४०) असे कात्रीने हल्ला … Read more

संतापजनक ! डबा खात बाकावर बसलेल्या तरुणीला पुणेकराची काठीने मारहाण, कर्वेनगर मधील पश्चिमानगरीतील प्रकार

पुणे प्रतिनिधी | ‘पुणे तिथे काय उणे’ हि म्हण पुण्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रकाराला लागू पडते. पुण्यात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या रागाचे देखील कित्येक प्रकार आहेत. अशाच एका पुणेकरांच्या रागाचा रंग आज पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पाहण्यास मिळाला. कर्वेनगर येथे पश्चिमानगरी सोसायटीमध्ये एक मुलगा आणि मुलगी जेवणाचा डबा खाण्यास बाकावर बसले असता एक वृद्ध पुणेकर तिथे आला आणि त्याने तरुणासोबत … Read more

‘वट पौर्णिमा’ : जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे

पुणे प्रतिनिधी | जन्मो जन्मी हाच पती मिळण्यासाठी कामना करण्याची हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. जेष्ठ पौर्णिमेदिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाकडून सावित्रीने पतीचे प्राण माघारी आणले त्या दिवशीपासून वट पौर्णिमा सण साजरा केला जाऊ लागला अशी अख्यायिका आहे. मात्र पुण्याच्या पुरुषांनी जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून कामना केली आहे. … Read more

पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या तरुणीवर फेकले ॲसिड

  पुणे प्रतिनिधी| पुण्याच्या बुधवार पेठेत मागील काही शतकापासून देह विक्रीचा व्यवसाय चालतो. याच पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर ॲसिड फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ॲसिड हल्ल्यात पीडित तरुणी बचावली असून सुदैवाने तिला जास्त इजा झाली नाही. तिच्या गिऱ्हाईकानेच तिच्यावर ॲसिड हल्ला केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; … Read more

कार्यक्रमाला दांडी ! कोल्हे-आढळरावांनी आमने-सामने येणे टाळले

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे , आदर्श जिल्हा परिषद शाळा रानमळा ता. खेड जिल्हा पुणे या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाचे अवचीत्य साधून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आजी माजी खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र दोघांनी हि आमने सामने येण्याचे टाळत कार्यक्रमाला दांडी मारली आहे. दिसाल तिथ मार खाल : … Read more