अजित दादांचं सगळीकडे बारकाईनं लक्ष असतं; रोहित पवारांकडून काकांचे कौतुक

पुणे । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे त्यांच्या तडफदार स्वभावामुळे सर्वांनाच परिचित आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील अनुभवाचे एक ट्विट केले आहे. ज्याला मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री कोरोना काळात सतत विविध बैठका घेऊन आढावा घेत आहेत. विविध उपाययोजनांसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. याबाबतीतच रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘अजित दादांचं सगळीकडे लक्ष असतं’ असे म्हंटले आहे.

काही अधिकाऱ्यांनी दादांच्या एकूण कामाच्या बाबतीत आपले अनुभव सांगितले आहेत. तेच रोहित पवार यांनी ट्विटमधून शेअर केले आहे. “अजित दादांचं सगळीकडं बारकाईनं लक्ष असतं.आज कोरोनाच्या संकटातही राज्यातील लोकांना व पालकमंत्री म्हणून पुणेकरांना कोणतीही अडचण येऊ देणार नसल्याचं ते सांगतात.त्यांची झटपट निर्णय क्षमता व आश्वासक शब्द हे आम्हाला खूप बळ देतात.’ असे शब्द या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका चांगलीच गाजली आहे. सर्व सुरळीत झाल्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले गेले होते. रोहित पवार यांच्या ट्विटवर दादांच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहीनी सहामहिन्यापूर्वी त्यांचे झटपट निर्णयही देशाने बघितले असल्याच्या प्रतिक्रिया देत चांगलाच टोला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.