राहुल गांधी पुन्हा होणार काँग्रेस अध्यक्ष; रिलॉन्चसाठी काँग्रेसची टीम लागली कामाला

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी घेत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार असल्याची वृत्त वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’या वृत्तपत्रानं दिलं आहे. राहुल गांधींना रिलॉन्च करण्यासाठी त्यांच्या सल्लागारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

राहुल गांधींनंतरच्या दहा पिढ्यासुद्धा सावरकरांच्या धाडसाशी बरोबरी करू शकत नाही- स्मृती इराणी

उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ”’मी माफी मागणार नाही, कारण मी राहुल सावरकर नाही असं मागे एकदा राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळं मला आज त्यांना सांगायचं आहे की तुमच्यानंतरच्या दहा पिढ्यांनासुद्धा सावरकरांच्या धाडसाशी बरोबरी करता येणार नाही.” असा घणाघात स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

संजय राऊत यांनी राहुल गांधींना उत्तर देण्याचं जे धाडस दाखवलं त्याच कौतुकच आहे..

काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचं धाडस दाखवलं त्याचं मी कौतुक करतो असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.” एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

केरळवासीयांनी राहुल गांधींना खासदार म्हणून का निवडून दिलं? – रामचंद्र गुहांचा सवाल

व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्याचा यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्विकारत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय होता अशी टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या लिटरेचर फेस्टिव्हलला संबोधित करताना रामचंद्र गुहा यांनी हा सवाल केला.

देशात आर्थिक आणीबाणी, मोदींनी घरगुती अर्थव्यवस्थेचे तुकडे केले – राहुल गांधी

टीम हॅलो महाराष्ट्र : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात प्रचंड महागाई, प्राणघातक बेरोजगारी आणि घसरणारा जीडीपी यामुळे ‘आर्थिक आणीबाणी’ची स्थिती निर्माण झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. कमरतोड़ महंगाई, जानलेवा बेरोजगारी और गिरती GDP ने ‘आर्थिक … Read more

राहुल गांधी पंतप्रधान झालेले पाहायचं होतं; दीपिकाचा जुना व्हिडीओ व्हायरल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयु) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून देशभरात निदर्शन पाहायला मिळत आहेत. या निदर्शनात सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,साहित्य,कला अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती या निदर्शनात सामील होऊन किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांसोबत उभी राहताना दिसत आहेत. यासर्वामध्ये आता बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा सामील झाली आहे.

राहुल गांधी हे फक्त मूर्खच नाहीत तर महामूर्ख आहेत; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

  चंदिगढ । भाजपचे वाचाळवीर नेते वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. या वाचाळवीर नेत्यांमध्ये आणखी एका भाजप नेत्याची भर पडली आहे. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजप खासदार नायब सिंह सैनी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी याच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला आहे. जर कोणी महामूर्ख असेल तर ते राहुल … Read more

काही मुलं मतिमंद असतात; शरद पोंक्षेची राहुल गांधींवर टीका

काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली

आरएसएसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मातेशी खोटे बोलत आहेत – राहुल गांधी

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशात ‘डिटेन्शन सेंटर’ नसल्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि ‘आरएसएसचे पंतप्रधान’ भारत मातेशी खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळं माफी मागणार नाही;राहुल गांधींनी केला भाजपवर पलटवार

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी देशात भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचे सांगत मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. हे करत असताना राहुल यांनी भाजपसाठी लोकप्रिय असलेल्या मेक इन इंडिया या घोषणेचा विपर्यास करत ‘रेप इन इंडिया’ असं म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयन्त केला होता. तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने करत राजकारण तापवलं असताना. राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान राहुल यांनी हे विधान केलं.