तमाम मराठी जनांना ‘पानिपत’ सिनेमा पाहण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन

मोठी उत्सुकता लागून असलेला ‘पानिपत’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ६ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे. ‘पानिपत’च्या तिसऱ्या लढाई वर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अर्जुन कपूर , क्रिती सेनॉन , संजय दत्त या तगड्या कलाकारांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. सध्या सर्व स्तरातून चित्रपटाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे आणि हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

‘मनसे’ने भोपळा फोडला!! कल्याण मधून राजू पाटील विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांना ८६,२२३ मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना ८०,६६५ मते मिळाली आहेत.

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सोमवारी विदर्भात प्रचाराला येत आहेत. सोमवारी, सकाळी ७.३० वाजता ते खासगी विमानाने नागपूर विमानतळावर येतील. विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागताचा स्वीकार करून ते वणी येथे रवाना होतील.

ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

काय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ??

देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

पुण्यात मनसेला ‘राज’गर्जनेसाठी अखेर मैदान मिळालं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ऐन निवडणुकीत भाजपने मनसे उपाध्यक्ष फोडून त्याला दिली उमेदवारी

नाशिक प्रतिनिधी| राजकरणात कधी काय होईल हे काहिच सांगता येत नाही. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने मनसेचे उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही बातमी वाचत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला असेल. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज … Read more

चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या ;मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा

पुणे प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा चंगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. याच निर्धारातून काँग्रेस आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अद्याप देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोथरूडचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मनसेला … Read more