राजू शेट्टींना दणका : स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर करणार भाजपात प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय रविकांत तुपकर भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात तुपकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण चेहरा होते. त्याच प्रमाणे त्यांचा … Read more

राजू शेट्टी लढवणार विधानसभा ; या मतदारसंघातून लढवणार निवडणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष , माजी खासदार राजू शेट्टी विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आघाडीच्या घटक पक्षांनी विनंती देखील केली आहे अशी माहिती समोर येत आहे. काजू खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का चंद्रकांत पाटील हे जर … Read more

खा. उदयनराजे भोसले आणि राजु शेट्टी बैठक संपन्न

सातारा प्रतिनिधी | ‘विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जावु नका’ अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांना केली. राजू शेट्टी हे खा. उद्यनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी सातारा इथं गेले असता चर्चेदरम्यान शेट्टी यांनी उदयनराजेंना ही विनंती केली. याबाबत बोलत असताना उदयनराजे म्हणाले की, ‘भाजपात प्रवेश करायचा की … Read more

राजू शेट्टी खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला; मनधरणीचा प्रयत्न

सातारा प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीला साताऱ्यात गेले असून उदयनराजेंच्या मनधरणीचे पुन्हा प्रयत्न सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उदयनराजे भोसले विरोधी पक्षाचा बळकट आवाज आहेत. सर्वसामान्यांच्या आवाजासाठी तुमच्या सारख्या विरोधी पक्षनेत्याची गरज असल्याचं यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान राजू शेट्टी यांनी आहे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या … Read more

‘नाव स्वाभिमानी, धंदे मात्र बेईमानी’ – रघुनाथ पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी | ‘नाव स्वाभिमानी, धंदे मात्र बेईमानीचे. शासनाला हाताशी धरून शेतकरी नेत्यांनीच शेतकऱ्यांना लुटले ‘असा सणसणीत टोला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज माजी खासदार राजू शेट्टी आणि नामदार सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी … Read more

पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जन आक्रोश मोर्चा’

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराने शेतीसह छोटे मोठे उद्योग – व्यवसाय अशा विविध घटकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. नागरिकांना महापुराच्या विळख्यातून लवकर सावरण्याची गरज आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरीकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी … Read more

कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात हजारो शेतकऱ्यांची फसवणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंदकर (स्पेशल रिपोर्ट) कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायात ज्यादा लाभाचे आमिष दाखवून 8 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाने पश्चिम महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून कडकनाथ प्रश्नी हजारो शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर आहेत. याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून … Read more

राज्य बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी यंत्रणांनी प्रामाणिकपणे तपास करावा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्य बँकेत झालेल्या घोटाळा केल्याच्या आरोपावरून राजकीय नेत्यांसह 76 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्यां मध्ये अजित पवारांसह दिग्गज नेत्यांची नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेमध्ये उडी घेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी … Read more

राजू शेट्टींनी मोर्चे काढण्या ऐवजी सूचना कराव्यात : चंद्रकांतदादा पाटील

सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारविरोधात मोर्चे, आंदोलने करण्यापेक्षा पूरग्रस्तांसाठी सूचना कराव्यात, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी राजू शेट्टी यांना लावला. जिल्हा अधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती आणि मदतीबाबतचा आयोजित केलेल्या बैठकीनंत पाटील बोलत होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसल्याने घरांसह, शेती आणि जनावरांचे अतोनात नुकसान झाले. नदीकाठच्या गावांना … Read more

सांगलीत पूरग्रस्तांसाठी ३१ ऑगस्टला मोर्चा : माजी खा.राजू शेट्टी

सांगली प्रतिनिधी| महापूरामुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पूरग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या मागणीसाठी ३१ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज … Read more