अजित पवारांना मोठा दिलासा; सिंचन घोटाळ्या प्रकरणी एसीबीची क्लीन चिट

जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रामाणिकेतवर संशय व्यक्त करत, या प्रकरणात अजित पवारांचे नाव असल्याने चौकशी अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप केला होता

आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.

सत्ताधारी विरोधकांचा कलगीतुरा; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा खरपूस समाचार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सामनाच दाखल देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याचा आता ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’,फडणवीसांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; अधिवेशनात विरोधकांची घोषणाबाजी

यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 

पुन्हा एकदा खडसे पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी प्रवेशावर नवाब मलिक म्हणाले…

भाजपला महाराष्ट्रात उभे करण्यात खडसेंचाही वाटा आहे. मागील ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.

‘स्वतःचा गोंधळ समोर येऊ नये म्हणून विरोधकांचा गोंधळ’; खासदार सुप्रिया यांचा आरोप

दोन दिवसापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात विधीमंडळात पहिल्याच दिवशी विरोधकांनी  सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीचे विधिमंडळाच्या कामकाजास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.

‘तुम्ही पुन्हा येणार..पुन्हा येणार’; नागपूरमध्ये झळकले बॅनर

देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन’ ही घोषणा चांगलीच गाजलेली होती. परंतु निकालानंतर भाजप ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने सत्ताधाऱ्यांकडून या घोषणेची खिल्ली उडवण्यात आली

भाजप सेनेच्या आमदारांची सभागृहातच हाणामारी; जयंत पाटील, फडणवीस धावले मदतीला

टीम, HELLO महाराष्ट्र| सोमवार पासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक पवित्र घेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली. या वेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेच्या आणि भाजपच्या आमदारांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. … Read more

पवारांसाठी का महत्वाचा आहे १२ डिसेंबर; सांगितलं हे कारण…

यावेळी बोलताना पवारांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. तसेच १२ डिसेंबर हा दिवस त्यांच्यासाठी का महत्वाचं आहे हे सांगितले.

ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; या नेत्याला सर्वात महत्वाचं खातं

नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इत्तर कुणाकडे जाण्याचा पायंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना गृह आणि नगरविकास खाते देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदेंकडून गृह खाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे.