काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.

सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे.

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्याचा शिवसेनेला पाठिंबा; शेकाप अडचणीत

राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.

चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

मित्रपक्षांचा गेम करत भाजपने बळकावल्या परभणीतील २ जागा; ४ मतदारसंघात ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

राष्ट्रवादी हा मतांची गणितं जुळवून दगाबाजी करणारा पक्ष – सुधीर कोठारी

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून ऐन वेळी तिकीट कापले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुधीर कोठारी यांनी बंडखोरी केली आहे.

कराड उत्तरमध्ये महायुतीला बंडाचं ग्रहण; माघार कोण घेणार – मनोज घोरपडे की धैर्यशील कदम ?

कराड उत्तर विधानसभा क्षेत्रात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला जनाधार नसून येथील खरी लढत मनोज घोरपडे विरुद्ध बाळासाहेब पाटील अशीच होईल असा अंदाज नागरिकांनीही व्यक्त केला आहे.

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

“राजकारण सोडतो, पण मी का नको हे पक्षानं सांगावं” – एकनाथ खडसे

शरद पवारांसाठी या १३ व्यक्ती आहेत खास, अजित पवारांचा समावेश नाही

thumbnail 1525167246887

मुंबई प्रतिनिधी | सोशल मिडियाचे प्रभुत्व असणार्या आजच्या काळात कोणती राजकीय व्यक्ती सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणाला फोलो करते व कोणाला करत नाही यावरुन नेहमीच वेगवेगळ्या चर्चा झडत असतात. जनसंपर्कासाठी सोशल मिडीयाचा वापर अलीकडील काही वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ट्विटर हे माध्यम राजकीय व्यक्तींसाठी प्रभावी माध्यम म्हणुन पुढे येत आहे. सोशल नेटवर्कींग साईट्सवर कोणी कोणाला फोलो … Read more