संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? राधाकृष्ण विखे- पाटलांचा पलटवार

नवी दिल्ली । काल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली होती. विखे-पाटलांसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते, अशी अत्यंत बोचरी भाषा या अग्रलेखात वापरण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून प्रत्युत्तर दिले. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आज … Read more

झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच राधाकृष्ण विखे पाटील टाळूवरचे केस उपटत असतील; सामनातून टीका

मुंबई । भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते असताना विखेंनी बुडते जहाज वाचवण्याऐवजी शत्रूला जाऊन मिळणे पसंत केले. नुकतेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सत्तेसाठी लाचार अशी टीका केली होती. एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र … Read more

राजभवनात येणाऱ्या ‘चक्रम वादळां’पासून सावध राहा! सामनातून राज्यपालांना खोचक सल्ला

मुंबई । शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील वाद शमेल, ही अपेक्षा आता पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर खोचक टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल आणि शिवसेनेतील शीत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अंतिम  परीक्षा … Read more

पंतप्रधान मोदी सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत; पण… – सामना

मुंबई । पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अशा शब्दात आज शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळण्यात आली आहेत. मात्र त्याचबरोबर साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या असं म्हणत भाजप … Read more

मोदीजी पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत- शिवसेना

मुंबई । मोदी यांनी पवारांना आपले गुरू म्हणून घोषित केलेच आहे व पवार फक्त राजकारणातले चाणक्यच नव्हे तर ‘कौटिल्य’ही आहेत हे दिसून आले आहे. सत्तेवर असणे वेगळे व राज्य चालविण्याचा अनुभव असणे वेगळे. त्यामुळे पवारांचा अनुभव याक्षणी महत्त्वाचा असून त्यांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. कोरोनामुळे वाढलेला खर्च आणि लॉकडाउनमुळे … Read more

दिल्ली हिंसाचार: शिवसेनेने भाजप सरकारला ‘या ७’ मुद्द्यांवर सामनातून धरलं धारेवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात दिल्ली हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेने आपल्या अग्रलेखात ७ मुद्द्यांवर केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. सामानाच्या अग्रलेखातून सरकारच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. सामनाच्या अग्रलेखातील ७ महत्वाचे मुद्दे १)दिल्ली जळत असताना गृहमंत्री कोठे होते? हिंसाचाराच्या वेळी निम्मे मंत्रिमंडळ अहमदाबादमध्ये होते. … Read more

”मोदींना पेढेवाले म्हणणाऱ्यांबरोबर भाजपा असल्याचा आनंद”; शिवसेनेचा सामनातून भाजपला टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी विचारणा करत वादाला आमंत्रण दिलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपने मैदानात उडी घेत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांचे वक्तव्य हा शिवरायांचा अपमान आहे असं म्हणत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं भाजपच्या टीकेला आज समानाच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं. शिवसेनेनं उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पेढेवाल्यांशी केलेल्या तुलनेवरुन अग्रलेखातून भाजपाला सुनावले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार यांच्यावर शिवसेनेनं डागली तोफ

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर भूमिका मांडताना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी वीर सावरकरांच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला होता. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? अशी विचारणा पाटलांनी केली होती. तर शरद पवार यांना लक्ष करत पवारांना जाणता राजा कसे म्हणता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादाला पूर्णविराम दिला. त्याचवेळी भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे. विशेष म्हणजे पाटील आणि मुनगंवार या दोघां भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खरपूस समाचार सामनाच्या अग्रलेखात घेण्यात आला आहे.

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार ? सामनातून शिवसेनेची जाणकारांवर टीका

 टीम, HELLO महाराष्ट्र |सामनातील अग्रलेखात शिवसेनेने महादेव जानकारांनी घेतलेल्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांवर चाललेच तोंडसुख घेतले आहे. अग्रलेखात शिवसेनेने रासपाच्या मेळाव्यावर तसेच संजय दत्त यांच्या कथित रासपा प्रवेशावर भाष्य केलं आहे. संजय दत्त जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वैगेरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या … Read more