Video : बिबट्या घरात घुसला अन् अख्या गाव पळाला

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे घरात बिबट्या घुसला होता. कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या थेट घरातच घुसल्याने घरातील लोकांची पाचावर धारण बसली. घरमालकाने चतुरायीने बाहेर पडत घराला कडी लावल्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हेळवाक येथे रात्री उशिरा बिबट्या एका घरात … Read more

कराड- चिपळूण मार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एल अँड टी कंपनीने तातडीने पूर्ण करा अशा सूचना संबंधितांना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, नाडे, मल्हारपेठ, आडूळ, म्हावशी … Read more

कास पठारावर 3 दिवसीय महोत्सवाचे आयोजन : रूचेश जयवंशी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जगप्रसिध्द असलेले कास पठाराला पर्यटन चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभाग जिल्हा प्रशासन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 7 ते 9 ऑक्टोबर असे तीन दिवसीय हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली. कास पुष्प पठारला वर्ल्ड हेरिटीजचा … Read more

लोकगीतातून लोकशाहीचा जागर स्पर्धेचे 31 ऑक्टोबर पर्यंत आयोजन

सातारा | निसर्गाशी संवाद साधणारी, श्रमपरिहारासाठी गायली जाणारी लोकगीते जशी आहेत तशी, पोवाड्यासारखे शैार्यगीत, लावणीसारखे शृंगारगीत यासारखी लोकगीतेही आहेत. तसेच भारुडासारखे आध्यात्मिक प्रबोधनपर गीतही आहे. भोंडला- हादगा, मंगळागौर, फुगडी, झिम्मा यांसारखी गाणी त्यांच्या लय-तालबध्दतेमुळे आताही स्त्रिया गातात. या गीतांमधून लोकशाही, मताधिकार याबद्दल जागृती करण्यासाठी लोकगीतातून लोकशाहीचा जागर या स्पर्धेचे आयोजन दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत … Read more

सातारा येथे 18 ऑक्टोबरला 22 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

सातारा | मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 22 वाहनांचा जाहिर ई – लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. लिलावातील वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा येथील आवारात दि. 6 ते 13 ऑक्टोबर … Read more

साताऱ्यात मानाच्या दुर्गादेवी भेटीला चेंगराचेंगरी : गर्दीमुळे 3 महिला बेशुध्द

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मोती चौकातील छत्रपती प्रतापसिंह मंडळ व सदर बझारची भारत माता या दोन्ही दुर्गादेवींची ऐतिहासिक भेट पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय सातारच्या मुख्य रस्त्यावर एकवटला होता. दरवर्षी रात्री 11 ते 12 या दरम्यान होणारी ऐतिहासिक दुर्गादेवींची भेट गर्दीमुळे लांबल्याने ही भेट चक्क पहाटे 3 च्या सुमारास झाली. दोन वर्षानंतर ही … Read more

नागझरीत “सिध्दनाथांच्या नावानं चांगभलं” : हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल खोबऱ्याची उधळण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागझरी येथे श्री सिद्धनाथ यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत व गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत मोठ्या उत्साहात पार पडली. श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत भक्तांनी व भाविकांनी गुलालाची उधळण केली गेल्या शेकडो वर्षापासूनची असलेली अखंड पालखीची परंपरा यावर्षी देखील मोठ्या भक्ती भावाने भाविकांनी … Read more

साताऱ्यात दांडिया खेळला गालबोट, अज्ञाताकडून हवेत फायरिंग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवकांची झुंबड मैदानाबाहेर पडली. यावेळी गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. सातारा शहरात मंगळवारी रात्री दोन गटात वाहन मागे घेण्यावरून दांडियावेळी वादावादी झाली. यानंतर त्याचे पर्यवसन थेट फायरिंगमध्ये झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. फायर करणारे पसार झाले असून, पोलिस … Read more

माजी उपनगराध्यक्षा दिपाली गोंडसे यांना मारहाण : भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा

सातारा | सातारा नगरपालिकेच्या माजी महिला उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे यांना भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या प्रकाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारानंतर जांभळे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे … Read more

पोलिसांच्या ताफ्यावरच जमावाचा हल्ला; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताफ्यावरच कराड तालुक्यातील हरपळवाडीत येथे जमावाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले.तर पोलिसांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतीत गावच्या इमर्सन कंपनीजवळ मंगळवारी सायंकाळी एका युवकास … Read more