तब्बल 1 कोटीचा गांजा जप्त : शेतकऱ्याने डाळिंबाच्या बागेत केली लागवड

Ganja,

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील खडकी परिसरात गांजा लागवडीवर छापा टाकण्यात आला आहे. शेतात मका व डाळिंबाच्या बागेत लागवड केलेला तब्बल 1 कोटीहून अधिक किमतीचा 422 किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली आहेत. म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही … Read more

देवीच्या दर्शनाला जाताना घाटात भीषण अपघात : 1 ठार तर 6 जण जखमी

khandala Ghat Accident

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुणे- बंगलोर महामार्गावर खंडाळा घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात 1 जण जागीच ठार तर 2 जण जमीर तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. लोणी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ) येथील राजेंद्र साबळे (वय- 40) … Read more

‘मी यशस्वी होणारच’ युवा व्याख्यानमालेतील IPS वैभव निंबाळकर कोण?

IPS Vaibhav Nimbalkar

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील आपण यशस्वी लोकांचे यश पाहतो. मात्र, त्यामागील प्रयत्न, कष्ट आपण पाहिले पाहिजेत. मोठे ध्येय अंगी बाळगा, मनाची स्थिरता आवश्यक बाब आहे. अभ्यास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या सवयी अंगी बाळगाव्यात. त्याच यशापर्यंत पोहोचवितात, असे मत आसाममध्ये कार्यरत असलेले धडाकेबाज आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर … Read more

महाविद्यालयीन युवकाची आत्महत्या : चिठ्ठीत लिहले ‘हे’ कारण

sucide

सातारा | वैभववाडी शहरात भाड्याने राहात असलेल्या खोलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गाडवे (मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे या मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मयत महेश गाडवे हा वैभववाडीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत … Read more

रहिमतपूरमध्ये मराठा बिझनेस फोरमचे उद्घाटन

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके भारतीय सैन्यदलापुढे शिवछत्रपतींचा आदर्श आहे. आपले सैन्यदल जगात नावाजलेले एक उत्तम सैन्यदल आहे. देशाची देशसेवा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सशस्त्र सैन्यदलात सामील व्हावे असे आवाहन माजी मेजर जनरल विजय पवार यांनी केले. रहिमतपूर येथे रहिमतपूर पंचक्रोशी मराठा बिझनेस फोरम शाखेचे उद्घाटन तसेच रहिमतपूर व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थातील आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी एन … Read more

परदेशात नोकरीचे आमिष : युवकाची 28 लाखांची फसवणूक

Karad Police

कराड | न्यूझीलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाला तब्बल 27 लाख 82 हजाराला गंडा घालण्यात आला. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विरवडे, (ता. कराड) येथील दिलीप सदाशिव धोकटे या युवकाने फिर्याद दिली आहे. डेव्हीड फ्रिज गेराल्ड व एडन झेवियर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

कराड दक्षिणसाठी 7 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर; कोणत्या गावात काय कामे होणार याची लिस्ट पहा

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून 7 कोटी 75 लाख रु. इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, पथदिवे, वस्त्यांचे विद्युतीकरण, शाळेच्या खोल्या बांधणे, ओढ्यावर साकव बांधणे, साठवण बंधारे, ग्राम तलाव दुरुस्त करणे, सोलर दिवे बसवणे, ग्रामपंचायत तसेच स्मशानभूमी यांना संरक्षण भिंत … Read more

Satara News : पाचगणी-वाई रस्त्यावर चालत्या कारने घेतला पेट

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर गावानजीक चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. आगोमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील वाई-पाचगणी येथे मुंबईतील चार पर्यटक कारने फिरण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांची कार … Read more

कराडच्या 19 वर्षांपूर्वीच्या मोठ्या उड्डाणपूलावर पडला हातोडा

Flyover Demolition Work Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील 19 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवारी रात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. तत्पूर्वी पूल परिसरातील महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. पूल पाडण्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याच्या कामास ८ फेब्रुवारीपासून … Read more

उदयनराजेंच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी मंजूर

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहराच्या दक्षिणेकडे विलासपूर आणि लगतच्या परिसरातील सुचवलेली साडेचार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून नुकतीच मंत्रालयातून या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले. … Read more