सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर कराडमध्ये झळकले

Satyajit Tambe victory banner in Karad

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. युवक काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षाला काॅंग्रेसने तिकिट नाकारल्याने ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. तर भाजपानेही सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला होता. अशावेळी राज्यातील काॅंग्रेसच्या युवकांनी सत्यजित तांबेंना आपला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. कराड शहरात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर … Read more

एसटीचे चाक महिलेच्या हातावरून गेले : कराडजवळील घटना

Kolhapur Naka Accident

कराड | येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाच्या कामामुळे लावलेल्या बॅरिगेट्समूळे सर्व्हिस रोडवर एकेरी वाहतूक सूरू आहे. या रोडने जाताना एका दुचाकी चालकाचा चालणाऱ्या महिलेस धक्का लागल्याने ती रस्त्यावर पडली. यावेळी महिलेच्या हातावरून एसटीचे चाक गेले. यात ती महिला गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हापूर नाक्यावर बोराटे पंपानजीक ही घटना घडली. शारदा बाळकृष्ण पाटोळे (वय 52, रा. जूळेवाडी … Read more

काय सांगता! कारखान्याचा काटा लॉक : पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस

Kisanveer Factories sugarcane

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस गाळपासाठी आणत आहेत. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः 22 ते 25 मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला. या वाहन मालकाने आणलेल्या ऊसाचे काैतुक म्हणून … Read more

कुसुंबीमुरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाई ठार

Bibtya

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. जावली तालुक्यातील कुसुंबीमुरा या दुर्गम भागात शेतात जनावरे चारण्यासाठी सोडलेली होती. या जनावरांच्यातील पांडुरंग कोकरे यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. कास पठार भागात हे गाव असून सध्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी जावळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून माहिती … Read more

सैन्य दलातील भावाने फसविल्याने युवकाची गळफास घेवून आत्महत्या

Kale Dayand Suicide

कराड | सैन्य दलात भरती करण्याचे अमिष दाखवून चुलत भावानेच 9 लाखाची फसवणूक केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कराड तालुक्यातील कोळे येथे ही घटना घडली. याप्रकरणी सैन्यदलात असलेल्या चुलत भावावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद बाबुराव काळे (वय- 25) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावरील ‘हे’ दोन उड्डाणपूल होणार जमीनदोस्त : काय आहे प्रशासनाचा प्लॅन ते पहा

Karad Kolhapur Naka

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  पुणे- बंगलोर महामार्गावरील दोन उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका आणि कृष्णा हाॅस्पीटलसमोर असलेले उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी संबधित कंपनीकडून सुरू आहे. एक नव्हे तर दोन उड्डाणपूल पाडण्याचा प्लॅन ठरला असून यासाठीच मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. परंतु येत्या 15 ते 20 दिवसात पूल पाडण्याच्या कामास सुरूवात होणार आहे. … Read more

दिव्यांग बांधवाचा निधी खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दिव्यांग बांधवांना शासनस्तरावरून मिळणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी 5% टक्के निधीस जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग सर्वे करण्याच्या कारणास्तव स्थगिती आदेश दिल्याने दिव्यांग बांधवांच्या हक्कावर गदा आली होती. यामुळे सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी हवालदिल होऊन न्याय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांचेकडे धाव घेतली व कैफियत मांडली. सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा … Read more

कोरेगाव तालुक्यातील दारू अड्डा उध्दवस्त : महिलांनी एकाला चोपले

Liquor den raid Koregaon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी- भाडळे येथील चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूच्या अड्डा सायंकाळी चिलेवाडी येथील रणरागिनींनी उद्ध्वस्त केला. यावेळी दारू अड्डा चालविण्याऱ्यास चांगला चोपही दिला. तसेच शेडमधील सर्व साहित्य व बाटल्या फोडून टाकल्या. चिलेवाडी- भाडळे चौक मध्यवर्ती आहे. वर्दळीच्या या चौकापासून भाडळे, चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी, बोधेवाडी (भाडळे), धनगरवाडी आदी … Read more

तांबवे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत बसविले ‘प्लेव्हर ब्लाॅक’

Zilla Parishad School

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढ चांगली झाली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून अनेक विद्यार्थी आज जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल झाले आहेत, असे प्रतिपादन केंद्र प्रमुख निवास पवार यांनी केले. तांबवे जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, तांबवे ग्रामपंचायतीचे वतीने 15 व्या वित्त आयोग निधीतून बसवण्यात आलेल्या प्लेव्हर ब्लाॅकचे व वर्ग … Read more

महिलेला कॉन्फरन्स कॉलवर घेवून मित्राला विनयभंगाची धमकी : खंडणीचा गुन्हा

Satara Police City

सातारा | न्यायालयीन एका प्रकरणात जामिनासाठी मदत केल्याच्या सांगत वारंवार पैशांची मागणी करणे व न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्यावर शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक केली. महेश शंकर लवंगारे (वय- 26, रा. दौलतनगर, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार राजरतन सोरटे (वय- 25, मूळ रा. नातेपुते, ता. माळशिरस, … Read more