आदर्शवत : केसुर्डी गाव कारभाऱ्यांनी केला स्त्रीचा सन्मान, अन् पायपीट थांबली

Kesurdi Gram Panchayat

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नायगाव (ता. खंडाळा) या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने स्त्री सन्मानाचा मोठा आदर्श घालून दिला. सरपंच व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील 30 शाळकरी मुलींना सायकली पुरवल्या. त्यामुळे चालत जाणाऱ्या शाळकरी मुलींची पायपीट थांबणार आहे. केसुर्डी गावातील मुलींना व मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास … Read more

सातारा जिल्ह्यातील 22 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Satara SP Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी (दि. 11) रोजी सायंकाळी उशिरा झाल्या आहेत. त्यामध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांची मसूरला बदली झाली आहे. तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांची सातारा जिल्हा वाहतूक शाखेत, तर कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल … Read more

कराड शहरासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडून 10 कोटीचा निधी : रणजित पाटील

Karad City Press Conference

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रणजित पाटील यांनी याबाबतची माहिती कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सुलोचना पवार, युवासेना … Read more

महामार्गावर ट्रक- आयशरचा भीषण अपघात : केबिनमध्ये चालक आडकला

Pune-Bangalore Highway Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर वराडे (ता.कराड) गावाजवळ आज दुपारी ट्रक व आयशरचा भीषण अपघात झाला. यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकला होता. सुदैवाने, जीवितहानी झाली नाही, मात्र आयशरच्या चालकाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ ट्रकला पाठीमागून आयशरने (क्र.- MH- 12-DG-8083) … Read more

जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करुया : खा. श्रीनिवास पाटील

Road Safety Campaign

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सध्या वाहतुकीचा वेग वाढला आहे. या वाढलेल्या वेगामुळेच अपघतांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे प्रवास करताना सर्वांनी वेगमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. सहसा रात्रीचा प्रवास टाळावा. अपघात टाळण्यासाठी डोळे महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रवास करताना जास्ती काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग्य नियोजन करा, त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर … Read more

रामकृष्ण वेताळ मित्र परिवाराचा शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम स्तुत्य : अरूण पाटील

Ramkrishna Vetal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी समाजातील प्रत्येक घटकांने सामाजिक भान जपत काम करणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात समाज उपयोगी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. रामकृष्ण वेताळ मित्र परिवाराने आज शेकडो मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गाैरव उद्दगार कृष्णा- कोयना पतसंस्थेचे चेअरमन अरूण पाटील यांनी काढले. सुर्ली (ता. कराड) … Read more

भूकबळी, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषणावर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे शेती : डॉ. बुधाजीराव मुळीक

Koyna Bank Karad

कराड | देशात पूर्ण वेळ शेतकरी व अर्धवेळ शेतकरी अशी वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेती विषयक विविध योजना पूर्णवेळ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणे शक्य होऊ शकेल. भूकबळी, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषण या सर्व समस्यांवर प्रभावी शेती हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यास अशा विविध समस्या संपुष्टात येऊ शकतील. राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने … Read more

सातारा गारठला : महाबळेश्वरच्या वेण्णालेकचे तापमान 4 अंशावर

Mahabaleshwar Temperature

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज पहाटे पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 4 अंश पर्यंत खाली गेला आहे. वेण्णालेक परिसरात आज पहाटे वेण्णालेक नौकाविहारासाठी ये -जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात हिमकण जमा … Read more

निवृत्त तहसिलदाराला तोतया पोलिसांनी लुटले

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी निवृत्त तहसीलदारांचे साडेचार लाख रुपयांचे दागिने पळविले. गोडोली परिसरातील हॉटेल समुद्रसमोर ही घटना घडली. याबाबत शंकरराव तुकाराम मुसळे (वय- 82, रा. साईकृपा गिरिचिंतन कॉलनी, विलासपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकरराव मुसळे हे सायंकाळी रस्त्यावरून चालत निघाले होते. त्यावेळी गोडोलीतील हॉटेल समुद्रसमोरील रस्त्यावर … Read more

जातपंचायतीच्या 5 जणांवर गुन्हा : प्रेमसंबधाच्या संशयावरून 2 लाखांचा दंड अन्यथा बहिष्कृतची धमकी

Pusegaon Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुसेगाव (ता. खटाव) येथे महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाच्या संशयावरून बेकायदा जातपंचायत भरवून मुलाच्या कुटुंबियांवर 2 लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावणे. तसेच दंड न भरल्यास सामाजिक बहिष्कार टाकल्या प्रकरणी 5 जणांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मतन लक्ष्मण शिंदे, लाव्हाऱ्या लक्ष्मण शिंदे, विकास मिन्या शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे, इंद्रा चंद्रकांत शिंदे … Read more