कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याने मालकाला नागरिकांनी चोपले

cafe

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अश्लील चाळे करणाऱ्यांना तसेच कॅफे चालकाला नागरिकांनीच चांगलाच चोप दिला. यावेळी उपस्थित नागरिकांनी आक्रमक होत कॅफे बंद केला. वाई शहरात गेल्या चारच दिवसापूर्वी अल्पवयीन युवतीवर कॅफेत बलात्काराची घटना ताजी आहे. तरीही सातारा शहरात असे … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन

Anganwadi workers

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत, प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. तेव्हा वेतनवाढ करावी अशी, मागणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी केली आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना निवदेन … Read more

आनंदराव चव्हाण पंतसंस्थेकडून धनादेश व ठेव पावतीचे वितरण

Anandrao Chavan Pantsanstha

कराड | मंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पाटण शाखेतील कर्जदार सभासद अपघातात मृत्यू पावले. त्याच्या कर्जाला विमा संरक्षण असल्याने कर्ज भरून उर्वरित रक्कम वारसांना देण्यात आली. आनंदराव चव्हाण पंतसंस्थेचचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित या धनादेशाचे वितरण करण्यात आले. पाटण शाखेतील सभासद मुबारक चांद शेख (रा. पाटण) यांचे मुंबई येथे अपघाती निधन … Read more

सातारा- पाथर्डी महामार्गाचे काम रखडल्याने राष्ट्रवादीचे आंदोलन

Satara-Pathardi highway

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा- पाथर्डी महामार्गाचे काम कोरेगाव शहरात रखडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रचंड प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. पादचाऱ्यांची चालताना होत असलेल्या कसरतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येथील जुना मोटार स्टँडवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करून प्रांताधिकारी, तहसीलदारांना निवेदन देऊन काम तातडीने पूर्णत्वास न्यावे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन … Read more

अन्यथा कासच्या तलावात 26 जानेवारीला घेणार जलसमाधी : ग्रामस्थांचे उपोषण

Kas Lake People

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कास तलावाची उंची वाढविण्याच्या कामामुळे शेतजमिनी पाण्याखाली जाणार असल्याच्या कारणाने कास ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले असून, यात पाणीसाठ्यानंतर बाधित होणाऱ्या स्थानिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कास येथील तलावाची उंची वाढविण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. परंतु कास ग्रामस्थांना … Read more

बंधाऱ्यावरील चोरलेल्या 9 लाख 30 हजारांच्या प्लेटा जप्त : एकाला अटक, एक फरार

Dahiwadi Plats Stolen

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जाधववस्ती (ता. दहिवडी) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरल्यानंतर सातारा येथे विक्रीसाठी आणलेल्या असताना पाठलाग करून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. तर एकजण संशयित आरोपी पळून गेला आहे. अक्षय पोपट धस (वय- 26, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यास स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी जेरबंद केले. नितीन ऊर्फ अप्पा अशोक साळुंखे (वय- … Read more

कर्मचाऱ्याने मारली थोबाडीत अन् ग्राहक घुसला चाकू घेवून बॅंकेत

HDFC Bank Karad

कराड | बँकेतील कर्मचाऱ्याने थोबाडीत मारल्यामुळे संतप्त झालेला ग्राहक धारदार चाकू घेऊन बँकेत घुसला. आधार कार्ड लिंक करण्यावरून हा वाद झाला. त्यावेळी बँक व्यवस्थापकांसह इतर ग्राहकांनी संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सचिन रामा भिसे (रा. विजयनगर-मुंढे, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. … Read more

खा. उदयनराजेंच राष्ट्रवादीसोबत अंडरस्टँडिंग? : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कोणाच्या बद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणले, भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात … Read more

शेतकर्‍याच्या पोरीचा नादच न्हाय! पायात शूज घालून पळण्याचा सराव नसल्यानं अनवानी धावून मिळवलं सुवर्णपदक

Running Without Shoes

कराड | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची धमक असते. घरच्या परिस्थितीमुळे अनेकदा काहीजणांना शालेय जीवणात मोठा संघर्ष करुन शिकावं लागतं. शेतकरी कुटूबांतील मुलं- मुली तर अभ्यासासोबत मैदानी खेळांमध्येही तरबेज असतात. याचाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दानशूर बंडो गोपळा कदम उर्फ मुकादम तात्या विद्यालयात आला आहे. पायात शूज नसल्याने … Read more

कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल, याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी … Read more