गोटे गावच्या हद्दीत आंबे घेवून जाणाऱ्या गाडीला अपघात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पुणे- बंगळूर महामार्गावर गोटे गावाजवळ आंबे घेवून जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचा अपघात झाला. शनिवारी (दि.15 मे) सकाळी सात वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी हायवे हेल्पलाइने मदत केली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी येथून पुण्याला आंबे घेवून जाणाऱ्या गाडी क्रमांक (एमएच- 08 – एपी- 2740) गाडीचा अपघात झाला. गाडी चालकांचा … Read more

जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा- भाच्याचा नदीत बुडून मृत्यू

River Death

कराड | पाटण तालुक्यातील सोनवडे येथे जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा भाच्याचा मोरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशोक शंकर कदम (वय ३५, रा. सुळेवाडी, ता. पाटण) व अनिकेत हरिबा चव्हाण (१७, रा. जिंती, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनवडे येथे जनावरे धुण्यासाठी अशोक कदम व त्यांचा भाचा … Read more

चाफळमध्ये दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई

crime

कराड | कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कडक लाॅकडाऊन जाहीर केलेले असताना चाफळमधील काही दुकानदार दुकाने सुरू ठेवून मालाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोणीही नियम मोडून आपली दुकाने सुरू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात केवळ औषधांची दुकाने व … Read more

कृष्णेचा रणसंग्राम ः बुधवारी 19 मेपासून सुरू होण्याची शक्यता?

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील रेठरे येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू झाली आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून शुक्रवारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती केली आहे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती … Read more

गुडन्यूज ः सातारा जिल्ह्यात सर्वाेच्च 3 हजार 632 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 3 हजार 632 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित (2110) रुग्णांची संख्या कंसात जावली 106 (6340), कराड 206 (19189), खंडाळा 134 (8263), खटाव … Read more

कोविशील्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसांनंतरच, लसिकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करु नये

सातारा | केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशील्ड या लसीचा पाहिला डोस घेतला आहे. त्यांना दि. 15 मे पासून कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवड्याच्या दरम्यान (84 ते 112 दिवस ) देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन ॲप मध्ये दि. 14 मे च्या मध्यरात्री पासून करण्यात येणार आहे, असे … Read more

सातारा जिल्ह्यात रुग्णालयास पुरवठा केलेल्या ऑक्सिजनच्या ऑडीटसाठी तपासणी पथकांची नियुक्ती

oxygen plant

सातारा | सातारा जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. तथापि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. एकूण ऑक्सिजन पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता ऑक्सिजन वाया न जावू देता ऑक्सिजनचा कार्यक्षम वापरणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्याय, शासकीय तंत्रनिकेतन शासकीय … Read more

लसीकरणाचे वाटप व त्याचे आकडे रोज प्रसिद्ध करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस ज्यांचा आहे, त्यांना आधी दिला जावा. तसेच १८ ते ४४ वयोगटासाठी जी ऑनलाईन प्रक्रिया केली आहे. ती सक्तीची नसावी जेणेकरून सद्या जो लसीकरण केंद्राबाहेर गर्दीचा गोंधळ होत आहे, तो होणार नाही. तसेच लसीकरणाबाबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला, उपजिल्हा रुग्णालयाला, ग्रामीण रुग्णालयाला किती लसीचे डोस दिले आहेत. … Read more

चिंताजनक ः सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे व मृत्यूचे प्रमाण कमी होईना, आज नवे 2 हजार 110 पाॅझिटीव्ह तर 48 मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 110 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 281 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 25 हजार 950 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more

सुपने आरोग्य केंद्रातील सेविकांसह परिचारिकांचा हिदू एकताच्यावतीने सत्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सुपने येथे कोरोनाच्या कालावधीत परिचारिकांकडून केली जाणारी रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. त्यांच्या याच सेवेचा सन्मान करण्याच्या हेतूने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेविकांसह गावातील सर्वच परिचारिकांचा हिंदू एकताच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हिंदू एकताचे पाटण तालुकाध्यक्ष तुषार ऊर्फ गणेश पाटील, डॉ. सुनीता खरात, रमेश पाटील, परिचारिका … Read more