सातारा येथील क्रीडा संकुलात 78 बेड कोविड हॉस्पिटलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

सातारा | राज्यासह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांना यामुळे निश्चितच एक दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा आकडा वाढला ः गेल्या चोवीस तासात 1 हजार 666 बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 666 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 812 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 96 हजार 722 आहे. तर जिल्ह्यात एकूण 75 हजार 486 बरे झाले … Read more

यात्रा साजरी करणाऱ्या 16 जणांवर गुन्हा दाखल

crime

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत शनिवारी (दि. 24) कुसरुंड (ता. पाटण) येथील ग्रामदेवतेची पालखी काढून गर्दी केल्याप्रकरणी 16 जणांवर पाटण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद अनिल अशोक सुतार (वय- 29) यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरूनाचा संसर्ग रोखण्यासाठी खाजगी तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी … Read more

कराडजवळ तिहेरी अपघातात एकजण ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंकज हॉटेल जवळ बोलेरो-टेंम्पो-दुचाकी अशा झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबतची फिर्याद टेंम्पोचालक सुशिलकुमार संतोष गायकवाड (रा. शेणोली, ता. कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी बेलोरो चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  अपघातात विशाल निवृत्ती यादव (रा. विमानतळ, मुंढे, ता. कराड) असे … Read more

पोलिसांच्या रेकॉर्डवरील चौघांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Deportation

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड उपविभागात पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या चौघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी याबाबतचा आदेश दिला असून अन्य काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत. शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी (रा. हजारमाची-ओगलेवाडी, ता. कराड), अमित हणमंत कदम (रा. होली फॅमिली स्कुलमागे, वैभव कॉलनी, विद्यानगर-सैदापूर), तुकाराम ऊर्फ बाबा पंडीत जगताप (रा. कोडोली, … Read more

शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने ऊद मांजराची शिकार केल्याप्रकरणी तब्बल दहा जणांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग येथे शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने ऊद मांजराची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने तब्बल दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईत बबन बापू देशमुख (वय 40), गणेश किसन पवार (20), बाळू काळू जाधव (45), पोपट अप्पा देशमुख … Read more

कोरो इंडिया संस्थेकडून सातारा जिल्हा कोविड हॉस्पिटलला 200 बेडशीट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोविड रुग्णांसाठी महत्वपुर्ण सेवा बजावणाऱ्या सातारा जिल्हा कोविड हॉस्पिटलला कोरो इंडिया मुंबई या संस्थेच्यावतीने 200 बेडशीट देवून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी स्वयंम संस्थेच्यावतीनेही 10 हजार एन 95 मास्कचे वितरण करण्यात आले. सातारा जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये  200 बेडशीट रुबी हेल्थ केअर सर्व्हिसेसचे अपूर्व शहा, व्यवस्थापक सुरेंद्र दबडे, एचआर व्यवस्थापक प्रवीण दाभाडे … Read more

गुटखा विक्री ः डीवायएसपींच्या पथकाकडून पाऊण लाखांच्या मुद्देमालांसह एकजण ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करणार्‍यास डीवायएसपींच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान रमजान देसाई (रा. गोटे, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोटे गावच्या … Read more

खटाव, माण तालुक्यात ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार ः प्रभाकर देशमुख

Prabhakar deshmukh

सातारा | माण आणि खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णांकडून ऑक्सिजन बेडची मागणी सातत्याने केली जात आहे. शासनाकडून व खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेडच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तथापि या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे माण आणि खटावमध्ये ड्रीम सोशल फौंडेशनच्या प्रमुख अनुराधा देशमुख आणि मुकुल माधव फौंडेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या मदतीने … Read more

शरद पवारांना “लबाड” म्हणत सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जम्बो कोविड सेंटर उभे करायला सूचना केल्या होत्या. कोणीही कोविड सेंटर उभे केले नाही. आता साखर कारखान्यांना ऑक्सिजन फ्लॅन्ट उभे करायला सांगितले आहेत. लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं, म्हणजे राज्यात तहान लागल्यावर आड काढण्याचा उद्योग चालू आहे. आता तुम्ही प्लॅन्ट केव्हा उभा करणार, कारखानदार ते उभे करणार … Read more