NSE Scam : आनंद सुब्रमण्यमच आहे हिमालय बाबा; CBI लवकरच करणार खुलासा

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्ण या ज्याच्या सांगण्यावरून निर्णय घेत असे तो हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून आनंद सुब्रमण्यनच आहे. अर्न्स्ट अँड यंगच्या (E&Y) तपासणीत असे अनेक पुरावे सापडले आहेत, ज्यावरून असे सूचित होते कि हा रहस्यमय हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून सुब्रमण्यमच आहे. … Read more

युद्धाचा प्रभाव आणि जागतिक कारणांमुळे पुढील आठवड्यात बाजारात अस्थिरता राहणार, तज्ञांचे मत जाणून घ्या

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटामुळे जगभरातील शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सुमारे 3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजारात रिकव्हरी झाली. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी व्हॅल्यू शेअर्समध्ये खरेदी केली. गेल्या आठवड्यात निफ्टी 3.6 टक्क्यांनी आणि सेन्सेक्स 3.4 टक्क्यांनी घसरला. ब्रॉडर मार्केटमध्येही मोठी घसरण झाली. मिडकॅप इंडेक्स 3.4 टक्के … Read more

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांची मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 3.33 लाख कोटी रुपयांनी घटली

Recession

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केटकॅपमध्ये 3,33,307.62 कोटी रुपयांची मजबूत घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी, शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप फेब्रुवारीमध्ये सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,49,97,053.39 कोटी रुपयांवर घसरली. यापूर्वी जुलै 2021 मध्ये,लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप 2,35,49,748.9 कोटी रुपयांच्या नीचांकी पातळीवर … Read more

युद्धामुळे शेअर बाजार 3 टक्क्यांनी घसरला; विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच

Share Market

नवी दिल्ली । गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. युद्धसदृश परिस्थितीच्या अनिश्चिततेच्या दरम्यान गेल्या आठवड्यात बाजारात कमालीची अस्थिरता दिसून आली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गुरुवारी सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशीच बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. … Read more

विदेशी गुंतवणूकदारांनी FY22 मध्ये विकले 2.22 लाख कोटींचे शेअर्स, यामागील करणे जाणून घ्या

मुंबई । विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) गेल्या 5 महिन्यांपासून भरपूर शेअर्स विकत आहेत. मार्च 2022 मध्ये संपलेल्या वर्षात, FII ने आतापर्यंत $29 अब्ज (रु. 2.22 लाख कोटी) पेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत. 80 टक्के हे गेल्या पाच महिन्यांत विकले गेले आहेत. जरी रिटेल गुंतवणूकदारांसह देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी प्रत्येक घसरणीत खरेदी केली असली तरी … Read more

Share Market : सेन्सेक्स 1,329 अंकांनी वाढला तर निफ्टी 16,650 च्या वर बंद झाला

Stock Market

नवी दिल्ली । सात दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात बाउन्सबॅक दिसून आला आहे. मार्चच्या मालिकेची सुरुवात चांगली झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या वाढीने बंद झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 1,328.61 अंकांच्या किंवा 2.44 टक्क्यांच्या वाढीसह 55,858.52 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 410.40 अंकांच्या किंवा 2.53 टक्क्यांच्या उसळीसह … Read more

Stock Market : बाजारात जोरदार रिकव्हरी, सेन्सेक्स पुन्हा 55 हजारांच्या पुढे तर निफ्टीही तेजीत

Stock Market Timing

नवी दिल्ली । एक दिवस आधी झालेल्या इतिहासातील पाचव्या मोठ्या घसरणीतून सावरत शेअर बाजाराने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. बाजार उघडताच सेन्सेक्सने 55 हजारांची पातळी ओलांडली. सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्स 792 अंकांनी वाढून 55,322 वर उघडला आणि निफ्टीही 268 अंकांच्या मजबूत उसळीसह 16,515.65 वर उघडला. गुंतवणूकदारांनी आज जोरदारपणे शेअर्स खरेदी केले आणि सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 1,152 … Read more

आज सेन्सेक्सच्या इतिहासातील 5वी सर्वात मोठी घसरण, बाकीच्या घसरणीबाबत जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याने भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 2702.15 अंकांनी म्हणजेच 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 815.30 अंकांनी किंवा 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला. 23 मार्च 2020 नंतर सेन्सेक्समध्ये इतकी मोठी घसरण दिसून आली आहे. 23 मार्च 2020 रोजी सेन्सेक्स 4,035.13 … Read more

Russia-Ukraine War : शेअर बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांचे झाले 13.32 लाख कोटींचे नुकसान

Stock Market

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट पसरली आहे. या देशांमधील संघर्षामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात गोंधळ उडाला. यामुळे भारतीय शेअर बाजार सलग सातव्या ट्रेडिंगचा दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. फक्त आजच्याच घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये BSE लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 242.28 लाख … Read more

Share Market : सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरला तर निफ्टी 16250 च्या खाली बंद

Recession

नवी दिल्ली । युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावाची झळ सध्या संपूर्ण जगाला जाणवत आहे. कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराच्या विकली एक्स्पायरीवर वाईट परिणाम झाला आहे. 23 मार्च 2020 नंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 2702.15 अंक किंवा 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. … Read more