धक्कादायक..!! ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न

उस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना घडली असून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

बंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच दिवशी हकालपट्टी

शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.

नवख्या उमेदवाराला स्वीकारलं, यातच मतदारांचे मोठेपण – चंद्रकांत मोकाटे

एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही सर्वसामान्य लोकांमध्ये दादा खूप आत्मीयतेने मिसळतात हेच दादांचे वेगळेपण आहे. माझ्या आजवरच्या सगळ्याच वाटचालीत मतदारांचा,शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

शरद पवार राजकारणातील सोंगाड्या, उध्दव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

शरद पवारांची राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी झाली असून शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज करमाळा येथे जाहीर सभेत बोलताना केली.

‘मी नम्रच आहे शिवसेनेनं त्याचा बोध घ्यावा’;नारायण राणेंची शिवसेनेपुढे शरणागती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. मी नम्रच आहे, शिवसेनेने त्याचा बोध घ्यावा, असे राणे यांनी स्पष्ट केल. असे असले तरी सिंधुदुर्गात लढत मात्र शिवसेना विरुद्ध राणे अशीच होत आहे.

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी; मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका

एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे बोलतो ते करून दाखवितो असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी धामणगाव रेल्वे येथील जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केलं.

पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल

“आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे