उदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे

मी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा, आता मात्र फक्त राष्ट्रवादाचा नाद इथे घुमेल असं म्हणत उदयनराजेंच्या येण्यामुळे हे सरकार आणखी मोठं बनणार असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले

‘आदित्यऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अधिक योग्य – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी | आठवडाभरात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. येत्या 24 ऑक्टोबरला राज्याची सुत्रे कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होणार आहे. तर, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महायुतीतील रिंपाईंचे नेते रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनेला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरेंऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी उद्धव … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.

कुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर टीकास्त्र

अमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, “आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद ३७१ बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं भाजपला वाटत असेल तर ३७० आणि ३७१ वर भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे?

राणे पिता पुत्रांसाठी मुख्यमंत्री कणकवलीत; शिवसेनेचा विरोध

कणकवलीत भाजप सेनेची युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे.

आमचं ठरलय, आता फक्त दक्षिण उरलंय; सतेज पाटील अमल महाडिकांना धूळ चारणार ??

कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आमच ठरलय, आता दक्षिण उरलय अशी नवी घोषणा केली आहे. यामुळं कोल्हापूर दक्षिणेतील वातावरण गुरुवारपासून ढवळून निघालं आहे.

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्याचा शिवसेनेला पाठिंबा; शेकाप अडचणीत

राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

महायुतीच्या स्टेजवरून शिवसेना खासदार हद्दपार; उस्मानाबादमध्ये निंबाळकर – पाटील कोल्ड वॉरला आणखीनच धार

सभास्थळावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो नाही. महायुतीची सभा असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचारावेळी भाजपबरोबर सेनेचेही झेंडे असं चित्र असताना सेनेचा एकही झेंडा या परिसरात पहायला मिळाला नाही.

तर तेजस ठाकरे होणार ‘युवासेना प्रमुख’ ?

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असतानाच आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे कारण म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकीय व्यासपिठांवर वाढलेला वावर. बुधवारी तेजस हे संगमनेरमधील शिवसेनेच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसून आले. यानंतर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.