इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. मोहिते पाटील घरण्यासोबत संबंध सुधारून बबन शिंदे भाजपच्या तिकिटावर मुलाला आमदार करण्याच्या खटपटीत आहेत. अशातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला माढा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजी … Read more

नाना पटोलेचे काँग्रेससोबत खटकले ; पोलखोल यात्रा रद्द होण्याची शक्यता

नागपूर प्रतिनिधी|  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वाद घालत नाना पटोले यांनी भाजपला अखेरचा जय श्रीराम घातला. आपल्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसला जवळ केले. मात्र त्या पक्षात देखील त्यांचे चांगलेच वाजण्याची शक्यता आहे. कारण नाना पटोले यांच्या पोल खोल यात्रेला काँग्रेस मधील काही नेत्यांनी अक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात ज्या ज्या ठिकाणी आपली … Read more

Breaking | औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागी शिवसेनेचे आंबादास दानवे विजयी

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाल्याने त्या जागी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या ताब्यात असणारी जागा आपल्या नावे करून घेण्यास यश मिळवले असून शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी काँग्रेस आघाडीच्या बाबुराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य मतदान करणात. महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेचे … Read more

शिवसेना प्रवेशावेळी रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीवर केली हि टीका

मुंबई प्रतिनिधी | मागील १३ वर्षांपासून शरद पवारांचे बोट धरून आम्ही राजकारणात आम्ही सुरवात केली. त्यांचे व आमचे नाते एक नेता व कार्यकर्त्याच्याही पलीकडे आपुलकीचे आहे़. ते नाते कायम ठेवत जनतेला न्याय व सुरक्षितता देण्यासाठी लोकाग्रहास्तव आणि पक्ष नेतृत्त्व कामाची कदर करत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे. … Read more

सुनील तटकरे करणार शिवसेनेत प्रवेश? दिली हि प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी सोडून शिवसेनत जाणार असल्याच्या चर्चेला आता ऊत आला आहे. मात्र सुनील तटकरे यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही. आपल्या पक्षांतरच्या बातम्या या खोट्या बातम्या आहेत असे म्हणले आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात सुनील … Read more

आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात म्हणून त्यांना पेंग्विन म्हणतात : धनंजय मुंडे

वाशीम प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत पेंग्विनच म्हणतात, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सभेत धनंजय मुंडे … Read more

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. ते राष्ट्रवादीत नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत असे बोलले जाते आहे. छगन भुजबळ शिवसेनेत गेल्यास त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होईल हे मात्र त्रिकाल बाधित सत्य आहे. विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका छगन … Read more

विजय शिवतारे आहेत आयसीयूमध्ये ; पुढील १० दिवस रुग्णालयातच ; जारी केला व्हिडीओ

मुंबई प्रतिनिधी | विजय शिवतारे यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नको म्हणून त्यांना डॉक्टरांनी थेट आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे अशी बातमी त्यांच्या मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांना फोन लावण्यास सुरुवात केली. म्हणून विजय शिवतारे यांनी … Read more

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना काल दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे काहीच कारण नाही असे त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर विजय शिवतारे यांच्या छातीत हृदयविकाराच्या … Read more

उन्मेष जोशींची ईडीने केली ७ तास चौकशी

मुंबई प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सात तास चौकशी केली. चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे ते म्हणाले. उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे … Read more