उद्धव ठाकरेंनी केले युतीबाबत मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपाचा जुना फॉम्युला बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘जागावाटपाचा फॉम्युला मी, मुख्यमंत्री आणि अमित शहा असे तिघेजण मिळवून ठरवू’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान

बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनीही रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलास तरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

जयदत्त क्षीरसागरांनी ५० कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतले ; पुतण्या संदीप क्षीरसागरने केले गंभीर आरोप

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांना जागा सोडल्यावर उरलेल्या जागा निम्म्या वाटून घेण्याच्या युतीच्या समीकरणावर चंद्रकांत पाटील यांनीविधान केले होते . जुने समीकरण आता योग्य ठरणार नाही व त्याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेत आपण मुख्यमंत्री व अमित शहा यांच्याशिवाय कोणालाही गृहीत धरत नाही. यावरून उद्धव ठाकरे चंद्रकांतदादा यांच्या विधानाला फारशी किंमत देत नसल्याचे दिसले.

Leave a Comment