निवडणूक काळात भाजप आयटी सेल संयोजकाने केलं निवडणूक आयोगाचं काम- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्याशी संबंधित कंपनीला दिले होते, असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केल्यानंतर त्यावरून मोठं वादळ उठलं आहे. निवडणुकीशी संबंधित सोशल मीडियाचं काम निवडणूक आयोगाने एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देणं ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत काँग्रेस … Read more

पुणे जिल्ह्यामधील 750 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना सुरू; डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

प्रभाग रचनेचे काम जलदगतीने करून 30 डिसेंबर २०१९ पर्यंत प्रभाग रचना निश्‍चित करण्यात याव्यात अशा सूचनानिवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ४०० ग्रामपंचायती आहेत. त्यापकी निम्म्या म्हणजे ७०० ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत संपणार असून, त्यांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात अली आहे

निवडणूक आयोगाने घातली एक्झिट पोलवर बंदी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. या दिवशी आयोगाकडून मतदानोत्तर कल दाखवणाऱ्या एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे.

‘पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा’- सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांकडून पेडन्यूज होण्याची शक्यता असल्याने पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा आणि भारत निवडणूक आयोगाच्या याबाबत असलेल्या सूचनांची काटेकोर अमंलबजवणी करा,’ अशा सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश यांनी दिल्या. खर्च निरीक्षक श्री. नटेश यांनी जिल्हास्तरीय माध्यम कक्षास भेट देऊन कक्षाकडील कामकाजाची माहिती घेतली. प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा … Read more

निवडणूक आयोगाने लोकप्रिय ‘लुडो’ चिन्हाचा समावेश करत विधानसभेसाठी 197 चिन्ह दिली

मुंबई प्रतिनिधी। निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्‍चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हाला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने … Read more

महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले, २१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ला निकाल

महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडून आचारसंहिता लागू केली आहे. तसेच राज्यातील वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असून हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याने. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करत आजपासून महाराष्ट्रसोबत … Read more

राज्य निवडणूक आयोगातर्फे आजपासून आंतरराष्ट्रीय परिषद

State Election Commission

मुंबई | भारतीय संविधानातील 73 आणि 74 व्या दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे आज पासून मुंबई येथे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार असून, या परिषदेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील प्रमुख पाहुणे असतील. … Read more