काय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ??

देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगांत घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही – आडम मास्तर

सोलापूर प्रतिनिधी | राज्याभर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. असाच एका प्रचार सभेत कामगार नेते आडम मास्तर यांची जीभ घसरली आहे. प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

सर्व राजकारण्यांची संपत्ती वाढली मात्र आडम मास्तरवर गुन्हे वाढले असं वर्तमान पत्रात आलं होतं. माझ्यावर आत्तापर्यंत १६५ गुन्हे दाखल आहेत. आणि गुन्ह्यांची डबल सेंच्यूरी मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आपल्यावरील गुन्हे हे आपल्यासाठी अलंकार असल्याचं म्हटलं आहे.

माझ्यावर इतके गुन्हे नोंद असून मी भित नाही. मी परवानगी नसताना सत्याग्रह केले, आंदोलनं कली, मोर्चे काढले. हे सगळं लोकांसाठी केलं असं सागत काही जणांवर नुसते पाच गुन्हे नोंद काय झाले तर ते थरथर कापायला लागतात असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

 

Breaking | भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार, सुशिलकुमार शिंदेंचे मोठे वक्तव्य

एकमेकांना सहकार्य केलं तरच ते आघाडी धर्माचं पालन होईल असं म्हणत येत्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ताकदीने उभे राहतील असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

आघाडीतील बिघाडी टळली, राष्ट्रवादी युवक अध्यक्षाने घेतली प्रणिती शिंदेंविरुद्ध माघार

दरम्यान जुबेर बागवान यांच्या माघार घेण्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

हाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नावावर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब ; घोषणेची औपचारिकता बाकी

नवी दिल्ली | भारत स्वतंत्र झाल्या पासून कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मराठी माणूस बनला नव्हता. मात्र कॉंग्रेसने या ऐतिहासिक घटनेसाठी महाराष्ट्रातून एक नाव पक्क केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी निश्चित करण्यात आले असून त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करणे फक्त बाकी आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या … Read more

सर्व राज्यांच्या कॉंग्रेस समित्या बरकास्त ; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा काँग्रेस कार्य समितीने मंजूर नकरता एक महिना हा पेच सोडण्यासाठी राहुल गांधी यांना पदावर कायम राहण्याची विनंती केली. ती विनंती राहुल गांधी यांनी मान्य देखील केली. मात्र आता पक्षाने नवीन फतवा काढून सर्व राज्यांच्या काँग्रेस समित्या बारकास्त केल्या आहेत. … Read more

वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा !

Untitled design

मुंबई प्रतिनिधी| महाराष्ट्रात लोकसभेवर जाण्यापासून अनेकांना वंचित ठेवणारी वंचित बहुजन आघाडी राज्यात विधानसभेला मोठा करिष्मा दाखवणार आहे असे चित्र सध्या लोकसभा निकालावरून दिसते आहे. कारण राज्यातील २ विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी १ क्रमांकाची मते घेण्यात यशस्वी झाली आहे. याचा अर्थ हा होतो कि वंचित या मतदारसंघात हमखास निवडून येणार आहे. तर राज्यातील ७ विधानसभा मतदारसंघात … Read more

सुशीलकुमार शिंदेची पराभवाकडे वाटचाल

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी| काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरातून सलग दुसऱ्यांदा पराभव होत असल्याचे चित्र सध्या निकालावरून दिसते आहे. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिध्देश्वर महाराज यांच्यात लढत होत आहे. यात भाजपने बाजी मारल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे. १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग ; शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल … Read more

बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांना प्रकाश आंबेडकरांनी तिलांजली दिली

Untitled design

 सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. त्यानिमित्त कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांना आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांचे विरोधी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोंडसुख देखील घेतले आहे. बाबासाहेबांच्या विचारांना आणि तत्वाला प्रकाश आंबेडकर यांनी तिलांजली दिली आहे असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. त्यांनी प्रकाश आंबेकर यांच्या सहितभाजपवर … Read more