चार दिवसीय कसोटी सामन्याच्या आयोजनावर लक्ष्मण सहमत नाही,याबाबत केले मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने चार दिवसांच्या कसोटी सामन्यावरील सूचनेला नकार दिला आहे.तो म्हणाला की या खेळाचे हे प्रारूप कमी केल्यास त्याचा अपेक्षित निकाल लागण्याची शक्यताही कमी होईल. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रम क्रिकेट कनेक्टमध्ये लक्ष्मण म्हणाला की, “मी चार दिवसांच्या क्रिकेट कसोटी सामन्यास कसलीही पसंती देत ​​नाही. पाच दिवस या स्वरूपामध्ये योग्य … Read more

कसोटी क्रिकेटला रोमांचित बनवण्यासाठी नासिर हुसेनने दिली ‘हि’ मोठी सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटपट क्रिकेटच्या युगात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने नुकतेच एक मोठे विधान केले आहे. कसोटी क्रिकेट लोकप्रिय आणि जिवंत ठेवण्यासाठी दर्जेदार खेळपट्ट्या असणे महत्वाचे आहे, असे नासिर हुसेन याचे मत आहे. स्टार स्पोर्ट्स प्रोग्राम क्रिकेट कनेक्टमध्ये हुसेन म्हणाला, “मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जर सपाट खेळपट्ट्या असतील जशा … Read more

सचिन तेंडुलकरने केली करोना व्हायरसची टेस्ट क्रिकेटशी तुलना, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार प्रमाणेच नागरिक सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत. करोनासंबधी जनजागृतीसाठी अनेक सेलिब्रिटी सध्या जनजागृती करताना दिसत आहेत. करोनाला रोखण्यासाठी संपूर्ण स्वच्छता आणि दक्षता घेण गरजेचं असल्याची जाणीव भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही लोकांना करुन दिली आहे. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आता … Read more

नामुष्की व्हाइटवॉशची! दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने केला ७ गडी राखत भारताचा पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही २-० असा विजय मिळवून न्यूझीलंडने भारताला व्हाइटवॉश दिला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवर आटोपला. भारतानं दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा … Read more

बुमराहच्या टीकाकारांना इशांतचे चोख प्रत्युत्तर !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा सध्या संभ्रमित झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्त कामगिरी करत असलेल्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या मनोवृत्तीमुळे आश्चर्यचकित झाला आहे. भारताकडून जास्त कसोटी सामने खेळलेल्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाणे त्याचा साथीदार मोहम्मद शमीप्रमाणेच बुमराहच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. इशांतने आपल्या … Read more

भारताचा कसोटी क्रिकेट मध्ये नवीन कीर्तिमान, ८ संघाना जमलं नाही ते भारताने करून दाखवलं !

टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली. भारताने या विजयासह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखत २४० गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे या अजिंक्यपद स्पर्धेतील इतर आठ संघांचे मिळून जेवढे गुण आहेत, त्या पेक्षाही जास्त गुण एकट्या भारताने कमावले आहेत.

रांची कसोटीत पुन्हा गुंजणार ‘धोनी… धोनी’ चा नारा

आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यात महेंद्रसिंह धोनीही हजेरी लावणार आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने धोनीला सामन्यासाठी हजर राहण्याची विनंती केली होती, ज्याला धोनीने आपला होकार कळवला आहे. ज्यामुळे कसोटी सामन्यात प्रेक्षकांची संख्या अधिक वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

खुशखबर ! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार ‘धोनी’..

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका विरोधात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात पहिल्या सामन्यात विजय मिळवत, दुसरा सामनाही टीम इंडियात खिशात घालण्याच्या तयारीत आहे. दरम्यान तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना रांचीमध्ये होणार आहे. रांची म्हटलं की क्रिकेट चाहत्यांना आठवतो तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. त्यामुळं या सामन्यात धोनी सहभागी होणार असे अपेक्षा वर्तवली जात आहे.