निवडणूक आयोगाने लोकप्रिय ‘लुडो’ चिन्हाचा समावेश करत विधानसभेसाठी 197 चिन्ह दिली

मुंबई प्रतिनिधी। निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्‍चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हाला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने … Read more

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या मित्रपक्षांनी केली घुसखोरी

परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. … Read more

बाळासाहेबांचे उपकार शरद पवार विसरले; आदित्य ठाकरेंविरुद्ध दिला तगडा उमेदवार

ठाकरे कुटुंबीयांना मदतीची गरज असताना पवारांनी डॉ सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

सभेत कुत्रा घुसला अन.. पवारांनी उडवली सेनेची खिल्ली

उस्मानाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर दौरा करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे उस्मानाबाद मध्ये आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या सभेत कुत्रा घुसला अन् त्यानंतर पवारांनी जे वक्तव्य केल त्या  वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. उस्मानाबादेत सभा सुरु असताना शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून … Read more

‘माझी हक्काची जागा मला मिळाली, हे कोणाचे उपकार नाहीत’- विजय शिवतारे

पुणे प्रतिनिधी। ‘महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही सूत्र ठरले होते. त्यानुसार, माझी हक्काची जागा मला मिळाली. महायुतीमधील पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, हे निश्चित होते. त्यामुळे आज जागा वाटप झाल्यानंतर पुरंदरचा विद्यमान आमदार असल्याने ही माझी हक्काची जागा मला मिळाली. ती देऊन कोणी माझ्यावर उपकार केलेले नाहीत’, असा टोला शिवसेनेचे मंत्री आमदार विजय शिवतारे … Read more

गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.

काँग्रेसच्या दिलीप सानंदांची निवडणुकीतून माघार; ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत घेतला निर्णय

बुलडाणा प्रतिनिधी। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सानंदा यांच्या निवडणूक न लढवण्यामागे एक वेगळेच असल्याचे कारण समोर येत आहे. ईव्हीएमने घेतल्या जाणाऱ्या मतदानावर संशय असल्याचे कारण पुढे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएमच्या मुद्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे … Read more

रत्नागिरी जिल्ह्यात सेना-भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर

रत्नागिरी प्रतिनिधी। राज्यात शिवसेना भाजपाची युती झाल्याचे दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे. परंतु भाजपाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी दापोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना – भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण ज्या मतदार संघातून शिवसेनेनं एबी फॉर्म भरून दिला आहे. त्याच मतदारसंघात भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत साठे यांच्या नावाने आपला … Read more

वादग्रस्त भाजपा आमदार राजु तोडसाम यांचा ‘पत्ता कट’  

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आर्णी – केळापूर विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार राजु तोडसाम यांचा विधानसभेसाठी पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत तोडसाम यांच्या जागी आता भाजपाचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची विधानसभेसाठी वर्णी लागली आहे. आमदार तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे … Read more