१५ वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? – अमित शहा

‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.

निवडणूक फक्त आठ दिवसांवर, उमेदवारांच्या पायांना भिंगरी!

आठ दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक, गतिमान प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून वाड्या वस्तीवर राबवलेला प्रचार, हे सर्व चित्र सध्या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर पाहायला मिळत आहे. जोरदार प्रचार, जोडण्या, वाटाघाटी, फोडाफोडी जोडाजोडी अशा घटना ग्रामीण भागात गतिमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रात्री जागु लागल्या आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता ‘रात्रीस खेळ चाले..’ ही राजकीय जोडण्यांची मालिका पुढील आठ दिवस सुरू राहील.

मोहोळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव ४ गावांचा मतदानावर बहिष्कार

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थ्यांना माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जाव लागतं. मात्र हा रस्ता खराब असल्याने एसटी वेळेत येत नाही. तसेच घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागतं.

निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

भाजप उमेदवाराचा गृहराज्यमंत्र्याना घरचा आहेर

अकोला जिल्ह्याताल मुर्तिजापूरचे भाजप आमदार आणि उमेदवार हरिश पिंपळे यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. तसंही आमदार पिंपळेंची भाषा वऱ्हाडी अन बोलणंही अघळपघळ. त्यामुळे पिंगळे यांचं भाषण म्हणजे नेहमी चर्चेचा विषय. मात्र, मुर्तिजापुरात आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पिंगळे यांनी केलेलं ताज भाषण जिल्हा भाजपातील गटबाजी कोणत्या थराला गेली आहे याचेच संकेत देणारे आहे.

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

पवारांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहेच – दिलीप सोपल

“आजही मला शरद पवार यांच्याविषयी आदर असून ते माझे थोरले बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर खरपूस टीका करावी किंवा झोडपून काढावं, त्यांना तो अधिकार आहे

उदयनराजेंना प्रचाराची गरजच काय ; त्यांच्या पर्सनालिटीचा मी पण फॅनच – आदित्य ठाकरे

मी उदयन महाराजांचा चाहता आहे. खरंतर मी आज त्यांनाच भेटण्यास आलो असून त्यांच्या शेजारी बसायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असंही आदित्य पुढे म्हणाले. आतापर्यंत साताऱ्यात राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा, आता मात्र फक्त राष्ट्रवादाचा नाद इथे घुमेल असं म्हणत उदयनराजेंच्या येण्यामुळे हे सरकार आणखी मोठं बनणार असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले

धनाभाऊंचे पंकजा ताईंना ओपन चॅलेंज, ‘ट्रम्प जरी आणले तरी माझा विजय निश्चित’

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. तर दुसरीकडे १८ तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.

…तो पर्यंत फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेनी बांधली खूणगाठ

‘जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही. तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही’, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली