निवडणूक फक्त आठ दिवसांवर, उमेदवारांच्या पायांना भिंगरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। आठ दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक, गतिमान प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून वाड्या वस्तीवर राबवलेला प्रचार, हे सर्व चित्र सध्या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर पाहायला मिळत आहे. जोरदार प्रचार, जोडण्या, वाटाघाटी, फोडाफोडी जोडाजोडी अशा घटना ग्रामीण भागात गतिमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रात्री जागु लागल्या आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता ‘रात्रीस खेळ चाले..’ ही राजकीय जोडण्यांची मालिका पुढील आठ दिवस सुरू राहील.

मतदानाच्या आठ दिवस अगोदर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यासाठी रात्र महत्त्वाची असते. दुखावलेला कार्यकर्ता किंवा नाराज असणाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी भेटीगाठी साठी स्टार कार्यकर्त्यांना पाठवले जाते. कार्यकर्त्यांना रात्री भेटण्याची वेळ दिली जाते. दिवसापेक्षा रात्री अधिक नाराजी दूर होत असते. त्यामुळे ग्रामीण भागात वाडी – वस्तीवर अशा लोकांशी चर्चा करण्याकरिता कार्यकर्त्यांची सध्या धावपळ सुरू आहे. वाटाघाटी , फोडाफोडी , जोडणी आणि नाराजी दूर करण्यासाठी स्टार कार्यकर्त्यांनी रात्रीचा खेळ सुरू केला आहे. आपल्या भागात आपल्या गावात आपल्या वाडी – वस्तीवर दगाफटका होऊ नये म्हणून कार्यकर्ते ही आत्तापासून रात्री जागू लागल्या आहेत.

हे सर्व करीत असताना या सर्व घडामोडीत आचारसंहिता भंग होऊ नये याचीही दक्षता कार्यकर्ते घेत असल्याचे दिसून येते. दरम्यान काही होऊ दे पण अस्तित्वाच्या लढाईसाठी, आपल्‍या नेत्यासाठी, आपल्या गटासाठी ,आठ दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत नेते मात्र पायाला भिंगरी बांधून ‘हर घर मे प्रचार’ करीत आहेत. फोडाफोडी , वाटाघाटी , नाराजी , कही खुशी कही गम , साम-दाम-दंड-भेद यासाठी पुढील आठ दिवस ‘रात्रीस खेळ चाले’ ही राजकिय जोडण्यांची मालिका मात्र सुरू राहणार हे नक्की!!

इतर काही बातम्या- 

 

 

 

Leave a Comment