Monday, February 6, 2023

परभणीत वाळू माफिया निर्ढावले ! तहसीलदारावर केला प्राणघातक हल्ला

- Advertisement -

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीपात्रात  अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाकडून प्रयत्न करण्यात येतोय .आज दुपारी असाच प्रयत्न करणाऱ्या  पाथरी तहसीलदारांच्या पथकावरच निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी हल्ला चढवण्याचा प्रकार घडला असून नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केल्यानंतर तहसीलदार आणि वाळू माफीयांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी पाथरी पोलिसांमध्ये  गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांच्या टोळ्या गोदावरी नदीला पोखरत आहेत.  या वाळू माफियांना आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे .अवैधरित्या वाळू उत्खनन अटकाव करण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक २४ तास वाळू माफियांवर लक्ष ठेवून आहेत. शनिवारी पाथरी तालुक्यातील गुंज गावात अवैध वाळू उत्खनन होत असल्या बद्दलची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार यांचे पथक या ठिकाणी पोहचले होते. नदीपात्रात उत्खनन होत असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर वाळू वाहतुक करणारे ट्रक्टर यांचा पथकाने नदीपात्रात अक्षरशः फिल्मी स्टाईल पाठलाग करत वाहनासमोर वाहन लावले .यानंतर वाळूमाफियांनी तहसीलदार व त्याच्या पथकावर हल्ला केल्याचा प्रकार  घडला आहे.

दरम्यान तहसिलदारांनी पाठलाग करून अवैद्य रितीने भरकेले ट्रॅकटर पकडे. मात्र रेती माफियांची संख्या जास्त असल्यामुळे तहसीलदार कागणे,तलाठी एस.व्ही.निरडे, शिपाई एन.एस.पवार, ड्रायव्हर अतुल जोशी यांना दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी पाथरी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आम्हाला 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा ‘Hello News’