शरद पवारांवर हल्ला करणाऱ्या भाजप प्रवक्त्याला अटक ; आता नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांच्यावर 2011 साली पंजाबमधील तेजिंदर पाल सिंह बग्गा याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बग्गा याला अटकही करण्यात आली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्र घेतला होता. त्यानंतर तेजिंदर बग्गाकडे पंजाब भाजपचे प्रवक्तेपदाची सूत्रे आली. दरम्यान तेजिंदर बग्गा यांना नुकतीच पोलिसांनी अटक केली असून मोहाली पोलिसांनी तेजिंदर यांच्या विरुद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

पोलिसांनी अटक केल्या तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्यावर पोलिसांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल अपशब्द वापरले. तसेच धर्म आणि जातीच्या आधारवर समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप बग्गा यांच्यवर करण्यात आलेला आहे.

बग्गा यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दिल्ली भाजपचे प्रवक्ता प्रवीण शंकर कपूर यांनी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबमध्ये मिळालेल्या सत्तेचा राजकीय गैरवापर करत आहेत. सत्तेचा वापर ते विरोधकांना धमकावण्यासाठी करत आहेत, अशी टीका कपूर यांनी केली आहे.