टेस्टिंग किट विक्रीतून नफेखोरी करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ”संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना काही लोक मात्र नफेखोरी करण्यास चुकत नाही आहेत. अशा भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते, घृणा निर्माण होते, अशा तीव्र भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत देशातील नफेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केंद्राला केली आहे. अशा नफेखोरांना देश कधीही माफ करणार नाही, असेही राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोविड-रॅपिड टेस्ट किटबाबत वितरक आणि आयातदारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. चीनमधून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटची किंमत २४५ रुपये इतकी आहे. मात्र आयातदाराकरवी हेच किट आयसीएमआरला ६०० रुपयांना विकले जात आहेत. म्हणजेच यातून १४५ टक्के फायदा उचलला जात आहे. दिल्ली हायकोर्टाने किटची किंमत ६०० वरून ४०० रुपये करण्याच्या सूचना केल्या. ही किंमत आकारली गेली तरी देखील फायदा ६१ टक्क्यांपर्यंत मिळवला जाणार आहे.

संपूर्ण देशात कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्वात गरजेची गोष्ट म्हणजे चाचण्या आणि त्यासाठी किटची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) विकण्यात आलेले टेस्टिंग किट अतिशय महाग आहेत. यावरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे चीनमधून आयात करण्यात येत असलेल्या टेस्टिंग किट बाबत अनेक राज्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या किटमधून अचूक परिणाम मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. यानंतर आयसीएमआरने पुढील आदेशापर्यंत हे किट्स वापरण्यावर बंदीही घातलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment