Sunday, February 5, 2023

खतांची वाढीव दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा : कृषी सभापती मंगेश धुमाळ

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खतांच्या पोत्यांवर वाढीव दराची एमआरपी लिहलेली किंमत दाखवून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. तेव्हा वाढीव दराने खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या सभेस कृषी विकास अधिकारी विनायक पवार, अनिल काळे, सदस्य प्रतीक कदम, सुरेखा जाधव, प्रियांका ठावरे, राजेश पवार आदी उपस्थित होते.

जिल्हा रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर या किंमती कमी केल्या गेल्या. सद्य परिस्थितीत खतांच्या किमती कमी होऊनही पोत्यांवर असल्याचे सांगून त्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. याबाबत कृषी विभागाने ठोस देतून. एमआरपी असल्याचे पावले उचलली असून वाढीव दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे यांनी सांगितले.