रझा अकादमीवर बंदी घालून कारवाई करा; भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरात न घडलेल्या घटनांच्या अफवा पसरवून महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे काम रझा अकादमीच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी घालण्याची शिफारस केंद्राकडे करावी, अशी मागणी भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत एक पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, मुस्लिम जातीयतेचे विष पेरणाऱ्या रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी. काल नांदेड, मालेगाव, अमरावती या ठिकाणी रझा अकादमीने त्रिपुरातील न घडलेल्या घटनेवरुन सर्वसामान्यांच्या घरांची तोडफोड केली, पोलिसांना जखमी केले. त्यामुळे या संघटनेवर तातडीने बंदी घालावी कारण हा यांचा इतिहास राहीलेला आहे.

मी मुख्यमंत्र्यांना आठवण करुन देऊ इच्छीतो २०१२ साली रझा अकादमीने घडविलेल्या दंगलीवरही आपण तेव्हा हीच मागणी केली होती. असे अतुल भातखळकर म्हणाले त्यामुळे धार्मिक दंगली घडविणाऱ्या रजा अकादमीवर कठोर कारवाई करण्यासोबतच कायमची बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करा, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Comment