हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक जमीन घेण्यात किंवा प्लॉट घेण्यामध्ये त्यांचे जास्त पैसे गुंतवत असतात. नुकताच एक सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यानुसार असे समोर आले आहे की, आजकाल बहुतांश लोक हे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात. बँकेतील ठेवी, सोने गाड्यांपेक्षा, मालमत्ता खरेदी करण्यामध्ये जास्त पैसा गुंतवला जात आहे. तसा विचार केला तर मालमत्ता खरेदी करणे तितके सोपे नाही. जर कोणताही फ्लॅट खरेदी करायचा असो किंवा कोणतीही जमीन खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठी जोखीम देखील घ्यावी लागते. सामान्य माणसांच्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. जर तुम्ही यामध्ये छोटीशी चूक केली, तर तुमचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतेही प्रॉपर्टी खरेदी करताना, तुम्हाला योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. आता प्रॉपर्टी खरेदी करताना कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी घेणार असेल तर त्यासाठी त्या आधी त्या भागातील लोकांना जाऊन भेटा. आणि प्रॉपर्टीचे त्या ठिकाणी साधारण दर किती आहेत? या सगळ्याची माहिती जाणून घ्याम त्यानंतर विकासक आणि इतर गोष्टींची देखील चर्चा करा. तसेच अनेक डेव्हलपर्स सणासुदीच्या काळात घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी ऑफर देत असतात. या ऑफरची तुम्ही माहिती घ्या. त्या सवलतीचा देखील तुम्हाला फायदा घेता येईल.
तुम्हाला जर घर खरेदी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार घर खरेदी करा. अन्यथा नंतर तुमच्यावर आर्थिक भार वाढू शकतो. तुम्हाला किती मोठे घर पाहिजे आहे? तसेच केवढा फ्लॅट हवा आहे? हे आधी ठरवा. तसेच तुमची आर्थिक जुळवाजुळव करा. आणि त्यानंतरच घर खरेदी करा. हे घर खरेदी करताना तुमच्या मित्रांशी तसे शेजारच्या लोकांची चर्चा करा. यामधून तुम्हाला थेट मालकाशी देखील संपर्क साधता येऊ शकतो. आणि तुमची आर्थिक भार थोडा कमी होऊ शकतो.
जर तुमचा थेट घर मालकाशी संपर्क झाला, तर तुमची कमिशनची रक्कम वाचू शकेल. आणि तुमच्या आर्थिक नुकसान देखील वाचेल. तुम्ही असलेल्या किमतीवर पाच टक्क्यांपर्यंत बचत करू शकता. यासाठी तुम्ही गृह निर्माण प्रकल्पात मालमत्ता खरेदी कराल असाल, तर कायदेशीर सर्व परवानगी घेतल्या पाहिजेत. तुम्हाला शक्य असेल, तितके रोख पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच पैशांचे जुळवाजवळ करा. यामध्ये तुम्हाला जास्त सूट मिळेल. कारण एक रकमी पैसे देऊन घर कमी किमतीत देखील खरेदी करता येतात.