हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतातील मसाल्यांच्या पदार्थांमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे हळद. त्यामुळे भारतामध्ये हळदीची लागवड (Cultivation of Turmeric) मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु कधीही हळदीची लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहेत. यामुळे तुमच्या नफ्यामध्ये दुपटीने वाढ होऊ शकते. तसेच बंपर उत्पन्न देखील मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात हळदी उत्पादनासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.
हळदीची लागवड कशी करावी?
हळदीची पेरणी ही विविध जातीनुसार 15 मे ते 30 जून दरम्यान केली जाते. कधीही हळदीची पेरणी करताना दोन सऱ्यामधील अंतर 30 ते 40 सेमी अंतर ठेवावे. यासह रोपापासून ते दुसऱ्या रोपापर्यंतचे अंतर २० सेमी ठेवावे. हळद पेरणीसाठी एकरी 6 क्विंटल बियाणे असणे आवश्यक असतात. हळदीचे पीक लावल्यानंतर त्या पिकाच्या लागवडीसाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची चांगली सोय केलेली असावी. साधारणता हे हळदीचे पीक आठ ते दहा महिन्यातच तयार होते. पीक परीपक्व झाल्यानंतर त्याची पाने सुटतात आणि ती तपकिरी ते पिवळ्या रंगाचे दिसू लागतात.
हवामान कसे असावे?
हळदीला उष्ण आणि दमट हवामान मिळाले की ती चांगली वाढते. या हळदीच्या पिकासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरते. चिकणमाती किंवा वालुकामय माती हळदीसाठी सर्वात उत्तम ठरते. या मातीचा pH 6.5 ते 8.5 च्या दरम्यान असायला हवा. हळदीचा उत्पादनासाठी चांगल्या खताचा वापर करणे तितकेच गरजेचे असते. शेणखत, निंबोळी पेंड आणि युरिया याचा वापर केल्यास हळदीचे पीक चांगले येते. तज्ञ सांगतात की हळदीच्या लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करणे उत्तम ठरते. हळदीचे पीक मिश्र शेती म्हणूनही करता येऊ शकते. अशा सर्व बाबींचे काळजी घेतल्यानंतर हळदीच्या उत्पादनातून चांगला नफा मिळू शकतो.