हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळा सुरू झाला की त्वचेचा त्रास देखील सुरू होतो. कडक उन्हामध्ये त्वचा लाल पडते, ती कोरडी होते आणि निस्तेजही दिसू लागते. काहींना तर उन्हामुळे त्वचेवर पुरळ येण्याचा त्रास देखील होतो. ज्यामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. परंतु या सगळ्या विकारांपासून वाचण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. तसेच त्वचेची काळजी योग्यरीत्या घेतली तर हे सर्व प्रकार टळू शकतात. त्यामुळेच आजच्या या लेखात आम्ही सांगणार आहोत की, उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने घ्यावी. (Skin Care Tips)
- उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा कोरडी पडत असेल किंवा लाल होत असेल तर त्यावर चंदनाचा लेप लावा. तसेच ताक दही यांसारखे पदार्थ त्वचेवर लावल्यानंतर शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तसेच दही आणि हळद एकत्र करून त्वचेवर लावल्यास कोणत्याही प्रकारचे पुरळ येत नाहीत.
- उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते त्यामुळे उन्हाळ्यात सर्वाधिक पाणी पीत जावा. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. तसेच, या पाण्यात सब्जा टाकून पिल्यास शरीरात उष्णता भडकणार नाही.
- उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बाहेर कामानिमित्त जायचे असेल तर सन स्क्रीमचा वापर नक्की करा. सनस्क्रीम लावल्यामुळे उन्हाच्या तीव्र किरणांचा परिणाम आपल्या त्वचेवर होत नाही.
- उन्हाळ्यामध्ये सतत येत असलेल्या घामामुळे चेहरा चिकट जाणू लागतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते. यावर उपाय म्हणून तुम्ही उन्हाळ्यात दर एका तासानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवत जावा. यामुळे चेहरा देखील तुमचा कोरडा पडणार नाही.
- उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी कलिंगड, टरबूज अशी फळे आहारामध्ये घ्या. तसेच द्राक्षे, काकडी, स्ट्रॉबेरी, लिची संत्रे अशा फळांचे देखील सेवन करा. अशा अनेक फळांमुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहील.