व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाणी पिताना या गोष्टी लक्षात घ्या…

आरोग्यमंत्रा /
पाणी हा घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक आहे कारण आपल्या शरीरातील ६६% भाग जलमय आहे. पाण्याने केवळ तहान भागत नाही तर ते शरीरातून घातक रसायनदेखील बाहेर काढण्यात मदत होते. त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते.

पाणी पिताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागते –

पाणी नेहमी घोट-घोट पिले पाहिजे त्यामुळे पचनशक्ती सुधारते.
ऋतूप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करावे. साधारण दररोज ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे.
सकाळी उठल्यावर १ ग्लास पाणी पिण्याने आपले अंतर्गत अवयव मजबूत होतात.
सकाळी पाणी थोडे कोमट करून पिण्याने फॅट्स कमी होतात.
अंघोळीनंतर १ ग्लास पाणी पिण्याने कधीही लो ब्लड प्रेशरची तक्रार होत नाही.
जेवण्याच्या ३० मिनिटांआधी २ ग्लास पाणी पिण्याने पचन शक्ती वाढते.
जेवताना पाणी न पिता जेवण झाल्यावर पाऊण तासाने पाणी प्यावे.
पाणी कधीही उभे राहून पियू नये, पाणी बसून प्यावे. उभे राहून बानी पिल्याने वातदोष वाढतो.
हडबडीत एकाच वेळी तांब्याभर पाणी पियू नये.
झोपण्यापूर्वी १ ग्लास पाणी पिण्याने हार्ट अटैक सारख्या त्रासापासून सुटका मिळते.
उन्हाळ्यात मोठाले थंड पाणी प्यावे तर हिवाळ्यात साधे किंवा थोडे कोमट पाणी प्यावे.
इतर महत्वाचे –

अब्दुल सतार वर्षा भेटीवर … भाजप प्रवेशाची शक्यता

या चोरांचं सरकार परत येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर

पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले