कर्नाटक मधील समाजकंटकांवर कठोर कारवाई करा; परभणीत सकल शिवप्रेमींचा निषेध मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी |  कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी शिवप्रेमींच्या भावना संतप्त झाल्या असून परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात सकल शिवप्रेमी बांधवांच्या वतीने 20 डिसेंबर रोजी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे .

महाराष्ट्रासह संबंध देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची कर्नाटक मधील बंगळुरू येथे काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे .या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी पाथरी तालुक्‍यातील सकल शिवप्रेमी यांच्यावतीने 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये एकत्र येत महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्यानंतर उपस्थित शिवप्रेमींनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला . यावेळी कर्नाटक मधील समाजकंटक व कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .दरम्यान सकल शिवप्रेमी बांधवांच्या वतीने तहसील व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

नायब तहसीलदार एस.बी कट्टे व सपोनि प्रविण सोमवंशी यांनी यावेळी निवेदन स्विकारले .यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कर्नाटक मधील बंगळुरू येथे काही समाजकंटकांनी महाराष्ट्रासह सबंध देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना करून महाराष्ट्र व भारत देशासह जगातील असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा काम या समाजकंटकांनी केलेले आहे. असे म्हणत पुढे म्हटले आहे कि, या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात दादासाहेब टेंगसे , मुंजाजी भाले पाटील , एकनाथ शिंदे , दिपक लिपणे , विश्वनाथ थोरे , विजयकुमार घुंबरे , रविंद्र धर्मे , मुंजाभाऊ कोल्हे , गोपाळराव साखरे , विजयसिंह कोल्हे , ज्ञानेश्वर शिंदे , गजानन धर्मे , संतोष सोळंके, अमोल भाले पाटील , बंटी शिंदे , प्रताप शिंदे , अनिल घांडगे , प्रताप इंगळे , पांडूरंग शिंदे , विष्णु काळे , डॉ . महेश कोल्हे , दत्तराव मायंदळे , प्रमोद चाफेकर , कैलास लिपणे, अजिंक्य नखाते ,शिवदास काळे , विशाल घांडगे , विशाल ढगे, गोपाळ आंबेगावकर , श्रीकांत झिंजान , तुकाराम पौळ, प्रदिप काळे , ओम काळे , नारायण दळवी, कैलास टेंगसे आदींचा सहभाग होता.

Leave a Comment