Pune Metro| पुणेकरांकडून मेट्रोला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून पुणेकरांसाठी नवनवीन सुविधा देण्यात येत आहेत. यातीलच एक भाग म्हणून मेट्रोने पुणेकरांसाठी दैनंदिन पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे दिवसभरात फक्त शंभर रुपयात मेट्रोने प्रवास करता येऊ शकतो. मेट्रोने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने दिवसभरासाठी एकच शंभर रुपयाचा पास काढला तर तो दोन्ही मार्गांवर अमर्यादित प्रवास करू शकतो.
सध्या पुणे मेट्रोने (Pune Metro) लाखो प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. या प्रवाशांना पिंपरी- चिंचवडमार्गे अर्धा तासांत पुणे स्टेशन, येरवडा, वनाजपर्यंत जाता येते. याच ठिकाणी रस्ते मार्गाने जात असताना दोन तासांचा कालावधी जातो. यामुळेच पुणेकरांकडून मेट्रोला सर्वात जास्त प्राधान्य दिले जात आहे. या कारणामुळे मेट्रोकडून ऑनलाईन आणि ऑफलाइन तिकीट काढण्याची सुविधा दिली जात आहे. आता मेट्रोने प्रशासनाने आणखीन एक पाऊल पुढे टाकत पुणेकरांसाठी पासची सुविधा आणली आहे
मेट्रो प्रशासन आपल्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड, मासिक पास देत आहे. यातील दैनंदिन पासच्या सुविधामुळे प्रवासी शंभर रुपयांमध्ये मेट्रोने अमर्यात प्रवास करू शकतात. यामुळे प्रवाशांच्या पैशांमध्ये मोठी बचत होत आहे. खास गोष्ट म्हणजे, हे पास मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर वापरता येत आहेत. कोणताही प्रवासी दैनंदिन शंभर रुपयाचा 6 सकाळी ते रात्री 10 वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत वापरू शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवसासाठी त्याला वेगळा पास काढावा लागतो.
पासवर कोणतीही सूट नाही (Pune Metro)
मेट्रो प्रशासनाने या पासची किंमत प्रति व्यक्ती 100 रुपये निश्चित केली आहे. एकदा हा पास घेतला की तो परत करता येत नाही. तसेच, सर्व लोकांसाठी या पासची किंमत 100 रुपयेच आहे. हा पास खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला मेट्रोने अमर्याद प्रवास करता येऊ शकतो.