लाचप्रकरण : कराडचा मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटची तलाठी यांनी धरलेली नोंद प्रमाणित करणे करिता लाचे मागितल्याप्रकरणी कराडच्या मंडल अधिकार्‍यावर लाच लुचपतच्या पथकाने कारवाई केली. नागेश निकम (रा. कुंडल, ता. पलूस) असे कारवाई केलेल्या मंडल अधिकार्‍याचे नाव आहे. तर नागेश निकम यांच्याकडे उंडाळे मंडल कार्यालयीन कामकाजासाठी होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटची तलाठी यांनी धरलेली नोंद प्रमाणित करणे करिता मंडल अधिकारी नागेश निकम याने 27 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणून नागेश निकम याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस हवालदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, विना जाधव, बाळासाहेब पवार यांनी केली.