Talathi Bharti Result 2023 : अखेर प्रतीक्षा संपली! तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबून राहिलेल्या तलाठी भरती 2023 ची (Talathi Bharti Result 2023) निवड यादी जाहीर झाली आहे. या यादीबरोबर प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी महसूल विभागाकडून एकूण 23 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर झाली आहे. तलाठी भरती परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन टप्प्यात घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थीनी अर्ज भरले होते. यातील 8 लाख 64 हजार 960 विद्यार्थी परीक्षेला बसले.

कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर?

भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांची यादी (Talathi Bharti Result 2023) जाहीर झाली आहे.

यादी कशी पहावी? (Talathi Bharti Result 2023)

सर्वात प्रथम गुगल किंवा क्रोमवर जाऊन https://mahabhumi.gov.in/mahabhumilink ही वेबसाईट ओपन करावे. त्यानंतर important Link मध्ये जाऊन निवड यादी व प्रतीक्षा यादीवर क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावे दिसतील. त्यातील आपल्या जिल्हा निवडून यादी पहावी.

महत्त्वाची सूचना (Talathi Bharti Result 2023)

महसूल विभागाने ही यादी जाहीर करत सांगितले आहे की, “निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल. जिल्हास्तरावरील कार्यवाही बाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्हयांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.”