Pune Railway Station : पुण्यातील ‘या’ रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; 38.54 कोटींची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रेल्वे आणि त्यांच्या स्थानकांचा विकास हा चांगलाच गतिशील झाला आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. याच अमृत भारत स्टेशन योजनेच्या (Amrit Bharat Station Scheme)  माध्यमातून पुण्यातील तळेगाव स्टेशनचा (Pune Railway Station) कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी 38.54 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

अमृत भारत स्टेशन योजना ‘ अंतर्गत मध्य रेल्वेच्या 76 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यातील पुणे रेल्वे अंतर्गत एकूण 16 स्थानके  ‘अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत’ विकसित केले जाणार आहेत. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तळेगाव, आकुर्डी तसेच कोल्हापूरचा सुद्धा समावेश आहे. त्यानुसार, स्थानकात प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तीन लिफ्ट बनवण्यात येणार आहे. त्याचे कामही वेगाने सुरु आहे. तसेच शौचालय, वेटिंग रूम, दोन एक्सलेटर उभारले जाणार आहे. तसेच ओव्हरब्रिज करणे, लिफ्ट बसवणे इत्यादी कामांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्थानके विकासाच्या पथावर जाणार आहेत. हे मात्र नक्की.

दरम्यान, केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून 44 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने तब्बल 1696 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व रेल्वे स्थानके नवनवीन सुविधांनी परिपूर्ण असतील. तसेच देशभरातील रेल्वे विभागाचा यामुळे मोठा कायापालट होणार आहे.