Wednesday, June 7, 2023

तालिबानने अफगाणिस्तानच्या 6 प्रांतीय राजधान्या घेतल्या ताब्यात, भारत आपल्या राजनेत्यांना बाहेर काढणार

नवी दिल्ली/काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या प्रभावामुळे परिस्थिती बिकट होत आहे. दरम्यान, भारत सरकारने अफगाणिस्तानच्या समंगान प्रांतातील मजार-ए-शरीफ येथील दूतावासातून आपल्या राजनेत्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानने सोमवारी अफगाणिस्तानची सहावी प्रांतीय राजधानी मजार-ए-शरीफ ताब्यात घेतली.

समंगान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर सेफतुल्ला सामंगानी म्हणाले की,”बाहेरील भागात काही आठवड्यांच्या संघर्षानंतर, समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी अधिकाऱ्यांना शहराला पुढील हिंसाचारापासून वाचवण्याचे आवाहन केले. यानंतर बंडखोरांनी कोणताही लढा न देता ऐबक मध्ये प्रवेश केला. सामंगानी म्हणाले, “ गव्हर्नरने शहरातून सर्व सैन्य मागे घेतले आहे. आता येथे तालिबानचे पूर्ण नियंत्रण आहे.”

तालिबान्यांनी देशाच्या बाहेरील भाग ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांनी प्रांतांच्या राजधानीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गेल्या 5 दिवसात तालिबानने पाच प्रांतीय राजधान्या ताब्यात घेतल्या आहेत. उत्तरेत तालिबान्यांनी कुंडुज, सार-ए-पोल आणि तलोकान काबीज केले. ही शहरे त्यांच्या स्वतःच्या नावाच्या प्रांतांची राजधान्या आहेत.

दक्षिणेला, इराणच्या सीमेला लागून असलेल्या निम्रोझ प्रांताची राजधानी जरांज ताब्यात घेण्यात आली आहे. तालिबानने उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या नौगाझान प्रांताची राजधानी शबरघनही ताब्यात घेतली आहे.