अमेरिकेला मदत करणाऱ्यांना घरोघरी शोधत आहे तालिबान, कुटुंबांना ठार मारण्याची दिली धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तानात तालिबान परतल्यानंतर सर्व काही बदलले आहे. जरी तालिबानने सर्वसामान्यांसाठी माफीची घोषणा केली असली आणि त्याने कोणावरही सूड घेणार नाही असा दावा केला असला तरी वास्तव वेगळे आहे. ज्यांनी अमेरिकन आणि नाटो सैनिकांना मदत केली त्यांचा तालिबानी सैनिक शोध घेत आहेत. तालिबानने अशी एक हिट लिस्टच बनवली आहे. अमेरिकेचे सहकारी पुढे आले नाहीत तर त्याच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी तालिबानने दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे. हा रिपोर्ट इशारा देतो की, तालिबान अमेरिका किंवा त्याच्या नाटो सैन्याला मदत करणाऱ्या अफगाणांच्या शोधात घरोघरी फिरत आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या रिपोर्ट नुसार, संयुक्त राष्ट्र म्हणते की, तालिबानने ज्यांना अटक करून ठार मारायचे आहे त्यांची लिस्टच तयार केली आहे. त्याचवेळी तो या लोकांना धमकी देत ​​आहे की, जर ते पुढे आले नाहीत तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ठार मारले जाईल किंवा अटक केली जाईल. काबूल विमानतळाच्या गर्दीतही अशा लोकांचा शोध घेतला जात आहे.

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील परदेशी सैन्याने अफगाणिस्तानात प्रवेश केला आणि तालिबानला सत्तेतून बेदखल केले. या दरम्यान, तालिबानवर कारवाई करण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेण्यात आली. ट्रांसलेटर आणि गुप्तचर माहिती देणारे यात सहभागी झाले होते.

तालिबानने माफीची घोषणा केली होती
तालिबानच्या कल्चर कमिशनरचे सदस्य एनामुल्ला समनगनी (Enamullah Samangani) ने मंगळवारी सरकारी टीव्हीवर सर्वांसाठी “माफी” जाहीर केली. त्यांनी महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले कि,”इस्लामिक अमीरातला महिलांना त्रास होऊ द्यायचा नाही. त्यांनी लोकांना कामावर परतण्याचे आवाहनही केले. अफगाणिस्तानसाठी तालिबान इस्लामिक अमिरातचा वापर करतो.”

जर्मन पत्रकाराच्या कुटुंबीयांची हत्या
तालिबान माध्यमांनाही लक्ष्य करत आहे. तालिबान सैनिकांनी काबुलमध्ये जर्मन वृत्तवाहिनी DW शी संबंधित अफगाण पत्रकाराच्या कुटुंबातील सदस्याची हत्या केली आहे. तर दुसरा गंभीर जखमी आहे. पत्रकाराचे बाकीचे कुटुंब गेल्या महिन्यात कसे तरी करून पळून गेले होते.

Leave a Comment