तालिबानने म्हंटले,”अशरफ घनी -सालेह यांना माफ केले, ते अफगाणिस्तानात परतू शकतात”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानची ताकद झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी आणि स्वयंघोषित राष्ट्रपती अमरूल्लाह सालेह यांना माफ केले आहे. तालिबानचे वरिष्ठ नेते खलील उर रहमान हक्कानी यांनी जिओ न्यूजला सांगितले की,” तालिबानने अशरफ गनी, अमरुल्ला सालेह आणि हमदुल्ला मोहिब यांना माफ केले आहे. तालिबान आणि तिघांचे वैर केवळ धर्माच्या आधारावर होते. घनी आणि सालेह यांची इच्छा असल्यास ते अफगाणिस्तानात परतू शकतात.” यासोबतच तालिबानने मुस्लिम देशांशी समेट करण्याचे आवाहनही केले आहे.

15 ऑगस्ट रोजी काबूल सोडल्यानंतर अशरफ घनी सध्या दुबईत राहत आहेत, तर अमरूल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानच्या पंजशीर व्हॅलीला आपला गड बनवले आहे. पंजशीर खोऱ्यातून ते बंडखोर तालिबान्यांना लक्ष्य करत आहेत.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तालिबान नेते खलील उर रहमान हक्कानी म्हणाले,”आम्ही अशरफ गनी, सालेह आणि मोहिब यांना माफ केले आहे. या तीन लोकांशी त्याचे वैर केवळ धार्मिक कारणावरून होते.” हक्कानी पुढे म्हणाले की,”आम्ही आमच्या बाजूने सर्वांना माफ केले आहे. आमच्या विरोधात लढणारी लोकं असोत किंवा सामान्य नागरिक. लोकांना देश सोडू नका असे आवाहन केले आहे.”

शत्रूचा अपप्रचार
हक्कानी म्हणाले की,” तालिबान त्यांच्यावर सूड उगवेल असा शत्रू अपप्रचार करत आहेत.” ते म्हणाले कि,”ताजिक, बलुच, हजारा आणि पश्तून हे सगळेच आपले बांधव आहेत. सर्व अफगाणी आपले भाऊ असल्याने ते देशात परत येऊ शकतात.”

व्यवस्था बदलणे हेच एकमेव ध्येय होते
तालिबान नेते म्हणाले की,”आमच्या शत्रुत्वाचे एकमेव कारण म्हणजे व्यवस्था बदलणे. ही व्यवस्था आता बदलली आहे.” ते पुढे म्हणाले की,” तालिबान अमेरिकेच्या विरोधात लढला नाही. अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही ही लढाई आपली संस्कृती, धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी लढली आहे. अमेरिकन लोकं आमच्या देशाविरुद्ध शस्त्रांचा वापर करत आहेत. तालिबानने त्यांच्या शत्रूंवर मोठा विजय मिळवला आहे.”

हक्कानी म्हणाले की,” अफगाणिस्तानमध्ये अत्यंत सक्षम आणि सुशिक्षित लोकं सरकार स्थापन करतील. यामध्ये सर्व गटांचा समावेश केला जाईल. असे मानले जाते की, देशातील वाढती निदर्शने थांबवण्यासाठी तालिबानचे हृदय परिवर्तन झाले आहे. याआधी झेंडे आणि आता पंजशीरमध्ये तालिबानच्या विरोधात बंडखोरांच्या हालचाली वाढल्या आहेत.”

Leave a Comment